मोहोळ : मोहोळ शहरासह तालुक्यात बिबट्याची दहशद पुन्हा सुरू झाली आहे. ३ जून रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भोयरे येथील गोरख बापू जाधव यांचे मालकीच्या म्हशीच्या एका रेडकावर हल्ला करत बिबट्याने त्याचा फडशा पाडला. या घटनेमुळे मात्र पुन्हा एकदा मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.
'श्री पांडुरंग' कारखान्याने उभारला हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्रकल्प https://t.co/dvsxowV9Pf
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
दीड वर्षापूर्वी मोहोळ शहरासह भोयरे, मलिकपेठ या परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन दिवसापूर्वी अनगर परिसरात बिबट्या पाहिल्याचे नागरिकांनी सांगितले. वन विभागाने त्या ठिकाणी जाऊन खात्री केल्यानंतर सदरचे ठसे बिबट्याचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ३ जून रोजी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान भोयरे येथील गोरख बापू जाधव यांच्या मालकीच्या एका रेडकावर हल्ला करत ते रेडकु जवळच असलेल्या खड्ड्यात नेवून त्या ठिकाणी बिबट्याने त्याचा फडशा पाडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या शेजारच्या ऊसात पळून गेला. त्यानंतर गोरख जाधव यांनी तात्काळ परिसरातील शेतकऱ्यांना संपर्क करून बोलावून घेतले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या घटनेमुळे मात्र भोयरे, मलिकपेठ, मोहोळ परिसरात एकच खळबळ उडालीय. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक सचिन कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत बिबट्याच्या पायाचे ठसे घेतले व बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रेडकाचा पंचनामा केला. या घटनेमुळे मात्र परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबातील लहान मुलांची व अंगणातील जनावरांच्या काळजीने शेतकरी हवालदिल झाला आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
सोलापूर शहरातील सर्व दुकाने चालू, अशी आहे नियमावली https://t.co/KgttAMlNs4
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
भोयरे येथील शेतकरी बाबासाहेब पवार यांनी सांगितले की, जनावरे बांधलेल्या ठिकाणी बिबट्या गेल्याबरोबर म्हैस दावण तोडून त्याच्या मागे पळत सुटली. त्याला पळवून पळवून त्या ठिकाणाहून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बिबट्या जवळच असलेल्या घासगवतात शिरला. त्यामुळे म्हैस दुसरीकडे बांधलेल्या जनावरात जाऊन उभी राहिली. त्याचा फायदा उचलत बिबट्याने त्याच म्हशीच्या रेडकाला जवळच असलेल्या कचऱ्याच्या खड्ड्यात पडले व त्या ठिकाणी त्याचा फडशा पाडला.
मुलगा होत नसल्याने पत्नी आणि 3 मुलींना दीड वर्षे ठेवले डांबून, पंढरपुरातील धक्कादायक प्रकारhttps://t.co/tgyLd4eTHb
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
भोयरे येथे म्हशीच्या रेडकावर जो हल्ला केला आहे, त्या प्राण्यांचे ठसे बिबट्याचेच वाटतात. दोन दिवसापूर्वी अनगर परिसरात मिळालेले ठसे बिबट्याचे होते. तो आता परतीच्या मार्गाला लागला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात जनजागृती सुरू आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतींनाही त्यासंदर्भात पत्र दिले आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन सतर्क राहावे. वन विभागाच्या माध्यमातून परिसरात रात्रगस्त सुरू ठेवण्यात येणार आहे.
जयश्री पवार – वनपरिक्षेत्र अधिकारी