नवी दिल्ली / बंगळुरु : भारतातील सर्वात खराब भाषा कोणती? असा प्रश्न गुगलवर केला असता कन्नड हे उत्तर येत आहे. या उत्तराने कर्नाटकात नाराजी पाहायला मिळत आहे. लोक आपला राग सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. लोकांचा राग इतका अनावर झाला की राज्य सरकारनं गूगलला थेट कायदेशीर नोटीस पाठवली. त्यानंतर गुगलने ते उत्तर हटवलं असून याबाबत माफी मागत, सर्चच्या परिणामांमध्ये त्यांचं मत नसतं, असं म्हटलं आहे.
'श्री पांडुरंग' कारखान्याने उभारला हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्रकल्प https://t.co/dvsxowV9Pf
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
जगातील सर्वात मोठे ऑनलाइन सर्च इंजिन गुगलने भारतीयांची माफी मागितली आहे. कंपनीने आपल्या सर्च इंजिनच्या माध्यमातून कन्नड भाषेला भारतातील सर्वात घाणेरडी भाषा म्हटले होते. यानंतर भारतीयांकडून गुगलचा कडवा विरोध झाला. आता गुगलला आपली चूक लक्षात आली आणि त्याचीच माफी मागण्यात आली आहे. सर्च इंजिन कंपनीने दावा केला, की हे कंपनीचे विचार नसून एक तांत्रिक बिघाड होता. गुगलवर जेव्हा लोकांनी ‘ugliest language in India’ (भारतातील सर्वात घाणेरडी भाषा) असे सर्च केले असता रिझल्टमध्ये ‘कन्नड भाषा’ असे दिसून येत होते. कर्नाटक सरकारने सुद्धा याला तीव्र विरोध केला.
भरमंडपात नवरीचे कॅमेऱ्यासमोर इशारे; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल #socal #media #vairalvideo #viral #व्हायरल #surajyadigital #नवरी #bride #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/IwDW4xUNsc
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
भारतात होणाऱ्या विरोधानंतर अखेर गुगल इंडियाचे प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिले. गुगलच्या सर्च इंजिनमध्ये सापडणाऱ्या अनेक गोष्टी सत्यच असतात असे नाही. अनेकदा इंटरनेटवर विचारलेल्या प्रश्नांची धक्कादायक उत्तरे येतात. हे चुकीचे असल्याचे आम्ही मान्य करतो. तरीही अशा गोष्टींची तक्रार मिळताच ती चूक दुरुस्त केली जाते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
'या' देशात एकही मच्छर, साप किंवा सरपटणारे प्राणी सापडणार नाही https://t.co/itRwpozLxu
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
सोबतच, गुगलच्या एल्गोरिदममध्ये आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत. गुगलचे विशिष्ट असे काहीच विचार नाहीत. तरीही गैरसमजुतीने लोकांची मने दुखावली आहेत. त्याबद्दल आम्ही माफी मागतो.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि बंगळुरूचे भाजप खासदार पीसी मोहन यांच्यासह अनेकांनी गुगलच्या या चुकीवर तीव्र आक्षेप नोंदवला. गुगलला ही चूक सुधारून माफी मागायला हवी, असे त्यांनी म्हटले. पीसी मोहन यांनी सोशल मीडिया पोस्ट करून कन्नड भाषेचे वैभव आणि इतिहास मांडला.
रणजितसिंह डिसले गुरुजींची कमाल, मोठी जबाबदारी मिळाली, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छाhttps://t.co/HwrsP8REBD
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या कन्नड भाषेने अनेक विद्वान घडवले आहेत. तर कर्नाटकचे मंत्री अरविंद लिंबावली यांनी सुद्धा कन्नड भाषेचा इतिहास मांडला. 2500 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या कन्नड भाषेचा अपमान आमचे गौरव कंलकित करण्यासारखे असल्याचे ते म्हणाले आहेत.
* गुगलविरोधात कन्नड भाषिक आक्रमक
6 कोटी नागरिकांची कन्नड ही बोली भाषा आहे. हा वाद ज्या वेबसाईटमुळे सुरु झाला, ती वेबसाईट आता बंद आहे. पण, गुगलला कन्नड भाषिकांनी माफी मागण्यास सांगितले आहे. गुगलकडे तक्रार करुन ही चूक दुरुस्त करण्यास कन्नड भाषिकांनी सांगितले आहे.
Google સર્ચ એન્જિને કન્નડ ભાષાને ખરાબ ભાષા ગણાવી, વિવાદ વકરતા માગવી પડી માફી… #Google #SearchEngine #KannadLanguage #SandeshNews pic.twitter.com/7eGp5qrC6O
— Sandesh (@sandeshnews) June 4, 2021
आम्ही या प्रकरणी कायदेशीर लढाई लढणार आहे. गुगलला कन्नड भाषेची बदनामी केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. कन्नड भाषेचे, कन्नड नागरिकांची जमीन, पाणी, भाषा आणि संस्कृती यावरुन हेटाळणी स्वीकारली जाणार नाही. हा कन्नड भाषेविरुद्ध नियोजित कट आहे. कन्नड भाषेच्या बदनामीविषयी छोटी गोष्ट देखील खपवून घेतली जाणार नाही, असे कन्नड विकास प्राधिकरणाचे टीएस नागभरण यांनी सांगितले आहे.