मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना नियंत्रणात येत आहे. येथे गेल्या ४ महिन्यानंतर पहिल्यांदा गुरुवारी (३ जून) फक्त एका कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान हा खूप दाटीवाटीचा परिसर आहे. धारावीत कोरोना पसरल्यास तो नियंत्रणात आणणे कठीण होईल, त्याचा फटका मुंबईलाही बसेल, अशी भीती होती. मात्र आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नामुळे रुग्णसंख्या कमी आहे.
'महागाई संकट वाटत असेल तर खाणं – पिणं सोडावं'
https://t.co/AyD8sC6aJH— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने मुंबईभर विविध मोहिमा राबवल्याच, पण मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण आणि आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीसाठी ‘मिशन धारावी’, ‘मिशन झीरो’सारख्या विशेष मोहीम राबवल्या. एकाच शहरात धारावीसारख्या दाटीवाटीच्या विभागासाठी अशी वेगळी व्यूहरचना असलेली कोरोनाविरोधातील मोहीम मुंबई महापालिकेने तयार केली आणि ती धारावीकरांच्या कलेने राबवली.
मोहोळ शहरासह तालुक्यात बिबट्याची पुन्हा दहशद, रेडक्यावर हल्ला https://t.co/FnJjZycOSP
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
मुंबई राज्यभरात गतवर्षी कोरोनानं शिरकाव केला. त्यावेळी मुंबईतील धारावी परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. धारावीतील अनेकांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेकांनी सुखरूप मात केली होती. मात्र, कालांतरानं महापालिकेनं ‘धारावी पॅटर्न’ राबवत धारावीतील रुग्ण संख्या आटोक्यात आणली. शिवाय त्यानंतर धारावीकरांनी सुटकेचा निश्वास ही सोडला. मात्र विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येनं नागरिकांना कोरोनाची बाधा होत होती. परंतु, यावेळीही धारावीकरांनी कोरोनाला हरवलं आहे.
कारण धारावी परिसरात अवघ्या एका नवीन रुग्णाची नोंद झाली आहे.
'श्री पांडुरंग' कारखान्याने उभारला हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्रकल्प https://t.co/dvsxowV9Pf
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पहिल्या लाटेच्या सुरुवातीला धारावीत कोरोनाने थैमान घातलं होतं. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या धारावीत दाटीवाटीची वस्ती आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र नंतरच्या काळात महापालिकेने केलेल्या काटेकोर उपाययोजनांमुळे पहिल्या लाटेत करोनाला थोपवण्यात धारावीला यश आलं. त्यानंतर दुसऱ्या लाटेतही धारावीबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच पुन्हा एकदा या परिसराने करोनाला रोखून दाखवलं आहे.
मुलगा होत नसल्याने पत्नी आणि 3 मुलींना दीड वर्षे ठेवले डांबून, पंढरपुरातील धक्कादायक प्रकारhttps://t.co/tgyLd4eTHb
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
धारावीत सध्या कोरोनाचे एकूण १९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या लवकरच आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण या करोना संसर्ग साखळी तोडण्यात या परिसराला यश आलं आहे. वेगवान चाचण्या, कोरोनाविषयीक नियमावलीची कडक अंमलबजावणी आणि नागरिकांकडून मिळणार सकारात्मक प्रतिसाद या जोरावर धारावीनं कठीण वाटणारी गोष्टी साध्य करून दाखवली आहे.
मुंबईतील पालिकेच्या १३ वॉर्डमध्ये सध्या एकही कंटेनमेंट झोन नाही. यात धारावी येत असलेल्या जी-उत्तर विभागाचाही समावेश आहे. धारावीत सध्या एकही चाळ आणि झोपडपट्टी ही पंटेनमेंट झोनमध्ये नाही, ही धारावीच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक बाब आहे. मात्र मायक्रो पंटेनमेंट झोनमध्ये १० ठिकाणांचा समावेश आहे, तर २१४ मजले हे सील करण्यात आले आहेत.
टीईटी शिक्षकांसाठी मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, 7 वर्षे मुदतीची अट रद्द https://t.co/eDn3RyKVBo
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
धारावीसह संपूर्ण मुंबई शहरातच कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र असं असलं तरीही मुंबईतील धोका पूर्णपणे टळलेला नाही. राज्य सरकारकडून अनलॉक प्रक्रियेसाठी ५ स्तर करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई दुसऱ्या स्तरावर आहे. मुंबई जेव्हा पहिल्या स्तरावर जाईल तेव्हा शहरातील बहुतांश निर्बंध हटवण्याबाबत विचार करण्यात येणार आहे.