मुंबई : मुंबईतल्या सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये मोठा अपघात घडला आहे. आज 5 वाजताच्या सुमारास येथील फाऊंटनच्या वरील मोठा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेतून सुदैवाने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले आहेत. गेस्ट हाऊसमध्ये आदित्य ठाकरेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असताना बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळले. यामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कुणालाच दुखापत झाली.
'श्री पांडुरंग' कारखान्याने उभारला हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्रकल्प https://t.co/dvsxowV9Pf
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
बैठक सुरु असतानाच अचानक बाहेर स्लॅब कोसळला. सह्याद्री अतिथीगृहातील चार नंबरच्या हॉल बाहेरील हा स्लॅब आहे. अचानक स्लॅब पडल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. यावेळी मंत्र्यांची चांगलीच धावपळ झाली.
भारतातील सर्वात खराब भाषा कोणती? उत्तरामुळे गुगलने मागितली माफी; गुगलविरोधात कन्नड भाषिक आक्रमकhttps://t.co/iUdD99llNA
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
आज संध्याकाळी 4.45 मिनिटांनी सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले. अचानक झालेल्या या दूर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दूर्घटना जीवघेणी होती त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय.
मोहोळ शहरासह तालुक्यात बिबट्याची पुन्हा दहशद, रेडक्यावर हल्ला https://t.co/FnJjZycOSP
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मोठ्या झुंबरसह हा पीओपी स्लॅब कोसळला. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाडण्याच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठक सुरु होती.
कोरोनाविरुद्धचे 'युद्ध' जिंकणार, धारावीत फक्त 'एक' रुग्ण आढळला https://t.co/S6ExPcDITZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
यावेळी सभागृहा बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले. अचानक झालेल्या या दूर्घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, स्लॅब कोसळला त्याठिकाणी कुणी उपस्थित असते तर मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेनंतर सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या दुर्घटनेनंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. यानंतर ही बैठक पार पडली अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
'महागाई संकट वाटत असेल तर खाणं – पिणं सोडावं'
https://t.co/AyD8sC6aJH— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021