प्योंगयांग : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जगात थैमान घातलं आहे. अशातच उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने देशात कोरोना पसरु नये, यासाठी कबुतरं आणि मांजरांना नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. कारण मांजर व कबुतर चीनच्या सीमेच्या माध्यमातून कोरोना व्हायरस पसरवतात, असं किम जोंगचं म्हणणं आहे. सोबतच भटक्या मांजरांना मारावे आणि चीनच्या सीमेतून देशात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही पक्षाला गोळी घालावी, असे आदेश आहेत.
'महागाई संकट वाटत असेल तर खाणं – पिणं सोडावं'
https://t.co/AyD8sC6aJH— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
संपूर्ण जगात कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. यातच कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी उत्तर कोरीयाचा हुकूमशहा किम जोंग उनने सर्व कबुतरं आणि मांजरांना नष्ट करण्याचा कृर आदेश दिला आहे. कारण कबूतरं आणि मांजरं चीनच्या सीमेच्या माध्यमाने कोरोना व्हायरस पसरवतात, असे उनचे म्हणणे आहे. दैनिक एनकेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियात कोरोना व्हायरसचा प्रकोप रोखण्यासाठी हुकूमशहा जोंग उनकडून अनेक उपाय योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतातील सर्वात खराब भाषा कोणती? उत्तरामुळे गुगलने मागितली माफी; गुगलविरोधात कन्नड भाषिक आक्रमकhttps://t.co/iUdD99llNA
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
हुकूमशहा जोंग उन यांचा अंदाज आहे, की हे प्राणी आणि पक्षी चीनला लागून असलेल्या सीमेवरून धोकादायक व्हायरस आणत आहेत. रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे, की कोरियातील नागरिकांनी हा आदेश अतार्कीक असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी एक असेही वृत्त आले होते, की उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने एका अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर देशातील सर्व प्रमुख रुग्णालयांत चिनी औषधांच्या वापरावर बंदी घातली होती. मांध्यमांतील वृत्तांनुसार, 60 वर्षीय ब्यूरोक्रॅट हृदयाच्या आजाराचा सामना करत होता आणि जोंग उनच्या जवळचा म्हणून परिचित होता.
कोरोनाला लगाम घालण्याच्या उपायांत, एक आदेश, भटक्या मांजरांना मारणे आणि चीनच्या सीमेतून देशात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही पक्षाला गोळी घालणे, असाही आहे. नुकतेच सीमेजवळील हेसन येथे एका कुटुंबाला शिक्षा देण्यात आली होती. आपल्या घरात मांजर पाळण्यासाठी त्यांना 20 दिवस आयसोलेशन केंद्रात ठेवण्यात आले होते. सीमेवरील शहरांत आणि गावांत अधिकारी लोक पक्ष्यांना मारताना आणि मांजरी तसेच त्यांच्या मालकांना शोधताना दिसून आले आहेत. कोरियातील अधिकारी स्थानिक लोकांवर प्राण्यांना मारण्यासाठीही दबाव टाकत आहेत.
मला कळतच नाही, लग्न का करतात ? नोबेल पुरस्कार विजेती मलाला #surajyadigital #Nobel #Malala #MalalaYousafzai #सुराज्यडिजिटल #लग्न #marriage #why pic.twitter.com/lis2BI32UO
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021