मेक्सिको : मेक्सिकोच्या पुएब्ला राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुएब्ला राज्यात एक जागा आहे सांता मारिया झॅकटेपेक. या गावात शेतकरी शेती करून पोट भरतात. त्यादरम्यान, त्यांच्या शेतात एक प्रचंड मोठा खड्डा तयार झाला आहे. खड्डा सुमारे ३०० फूट खोल आणि तो ७० हजार चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेला आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदा हा खड्डा १५ फुटांचा होता, पण नंतर झपाट्याने वाढत गेला.
कोरोनाला रोखण्यासाठी कबुतरं आणि मांजरांना नष्ट करण्याचे आदेश https://t.co/XHwgURhYZf
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
शेतात पडलेले खड्डे तुम्ही पहिले असतील, पण शेतातला हा खड्डा अचानक मोठा मोठा होत गेला तर काय होईल? तर तिथे एक सिंकहोल म्हणजेच भगदाड तयार होईल. पृथ्वीच्या पृष्ठभागावर अशी भगदाडे पडण्याच्या घटना काही नव्या नाहीत. पृथ्वीच्या आतील थर ठिसूळ किंवा मऊ झाले की जमिनीत अपोआप अशी खोल खोल विवरे तयार होतात. जमिनीत जेव्हा अशी मोठमोठी भगदाडे पडणार असतात त्याआधी क्वचितच कधीकधी जमिनीला दूरवर भेगा पडणे, त्या परिसरातील झाडे, इमारती एका बाजूला झुकणे, इमारतींनाही मोठमोठ्या भेगा पडणे, असे काही संकेत मिळतात. तर कधीकधी ही मोठाली भगदाडे अचानकच तयार होत जातात.
मोदी सरकार आणि ट्विटरमध्ये पुन्हा नवा संघर्ष पेटण्याची शक्यता https://t.co/NsL5kTPyCv
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
पुएब्ला राज्याचे गव्हर्नर मिगुएल बार्बोसा हुयर्टा म्हणाले की, सांता मारिया झॅकटेपेक शहरात असलेले खड्डा २० मीटर खोल आहे. हा खड्डा सातत्याने वाढत असल्याने जवळपासची घरेदेखील धोक्यात आली आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अधिकृत माहितीनुसार, खड्ड्याजवळ राहणारे कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आलं आहे. लोकांना या खड्ड्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आतापर्यंत यामुळे कुणालाही इजा झाली नाही.
मेक्सिको रीजनचे पर्यावरण सचिव बिएट्रीज मॅन्रिक यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा हा खड्डा पहिल्यांदा तयार झाला तेव्हा त्याची त्रिज्या केवळ १५ फूट होती, परंतु काही तासांतच ती झपाट्याने पसरू लागली. जमीन भूसभुसीत असल्याने असे होत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय जल आयोगासह सार्वजनिक संस्थाचे अधिकारी मातीचे नमुने संकलित करून तपासणी करणार आहेत.
मोठी गुडन्यूज – महाराष्ट्रात मान्सून दाखल, पाऊस बरसणार, शेतीच्या पुढील नियोजनासाठी पहिला पाऊस महत्त्वाचा https://t.co/c9iJDvasSv
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
जरी या कामासाठी ३० दिवसांचा कालावधी लागणार असला, तरी हा खड्डा सतत वाढत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, खड्ड्याच्या शेजारी राहणा-या एका व्यक्तीने सांगितले की तो वादळाच्या आवाजासाठी जेव्हा पहाटे उठला तेव्हा त्याने हा खड्डा पाहिला. त्यामध्ये पाण्याचे फुगे दिसत होते. त्यांना खूप भीती वाटली. त्यांचे घरही खड्ड्यात आले आहे याची त्यांनाही खंत आहे.