मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात महाविकास आघाडी किती काळ एकत्र राहील? याबद्दल भाष्य केलं. युती किंवा आघाडी चांगल्या कामासाठी असेल, कामं होत असतील तर ती का टिकू नये? आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही. पण काम करण्याची जिद्द असेल, तर पुढच्या कित्येक वर्षांसाठी जशी काम होईल तशी आघाडी टिकवू शकतो. असं ठाकरे म्हणाले.
शिवसेना-भाजप ही 25 – 30 वर्षांची युती तुटली आणि महाविकास आघाडी बनली. आता ही आघाडी किती वर्ष टिकेल या प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत सेना-भाजप युती आणि महाविकास आघाडीवर रोखठोक भाष्य केलं.
व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर बंद? अखेरची नोटीस https://t.co/1d82e8vJfh
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
मुख्यमंत्री म्हणाले, “कोरोनामुळे तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू शकलो नाही. शिवसेनेने जे केलं ते प्रामाणिकपणे केलं. भाजपशी 25-30 वर्ष युती केली, ती प्रेमाने केली आणि टिकवली. एका दिलाने, विचाराने एकत्र राहिलो. काय घडलं ते तुम्हाला माहिती आहे. आमची युतीतून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. युती किंवा आघाडी कशासाठी होते?”
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
युती 30 वर्ष टिकली, मग आघाडी किती टिकणार? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “जशी युती टिकली तशी आघाडी टिकेल. तीन पक्ष एकत्र आले आहेत. तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल”
पुन्हा भाजप-तुम्ही एकत्र येणार किंवा भाजप -राष्ट्रवादी एकत्र येणार अशा अफवा उठतात तर या अफवाच आहेत का?, असाही प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, कुरघोड्या असत्या तर हे सरकार चाललंच नसतं. स्थापन झालं तेव्हा मी नवखाच होतो, पण आम्ही एकमताने एकत्र आलो.
मोठी गुडन्यूज – महाराष्ट्रात मान्सून दाखल, पाऊस बरसणार, शेतीच्या पुढील नियोजनासाठी पहिला पाऊस महत्त्वाचा https://t.co/c9iJDvasSv
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
यावेळी उद्धव ठाकरेंना सेना भाजप एकत्र येऊ शकतात का, असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, त्याचं उत्तर दोन्ही पक्ष वेगळे का झाले यामध्ये आहे. एका विचाराने झालेली युती तुटली का, याचं उत्तर शोधावं लागेल. कामं होत असतील तर ती का टिकू नये? आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही. पण काम करण्याची जिद्द असेल, तर पुढच्या कित्येक वर्षांसाठी जशी काम होईल तशी आघाडी टिकवू शकतो. जशी युती टिकली, तशीच आघाडीही टिकेल. जोपर्यंत आमच्या तिघांच्या मनातला हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असेल, तोपर्यंत आघाडी टिकायला काय हरकत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
ठाकरे बंधू एकत्र येणार का? उद्धव ठाकरे म्हणाले… https://t.co/iSTZKdrh7G
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
पुन्हा भाजपा-तुम्ही एकत्र येणार किंवा भाजप -राष्ट्रवादी एकत्र येणार अशा अफवा उठतात, तर या अफवाच आहेत का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर कुरघोड्या असत्या तर हे सरकार चाललंच नसतं. स्थापन झालं तेव्हा मी नवखाच होतो, पण आम्ही एकमताने एकत्र आलो, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार की नाही, असा सवाल विचारल्यानंतर त्याचं उत्तर दोन्ही पक्ष वेगळे का झाले यामध्ये आहे. एका विचाराने झालेली युती तुटली का, याचं उत्तर शोधावं लागेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीचा गोंधळ संपला! मध्यरात्री निघाले आदेश; पाच टप्प्यात हटणार लॉकडाऊनचे निर्बंध
https://t.co/iSVF3cgOZW— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
आमची युतीबाहेर पडण्याची इच्छा नव्हती. आम्ही एका ध्येयाने एकत्र राहिलो. मात्र आम्ही जे केलं ते प्रामाणिकपणे केलं, असं सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाही. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे कौटुंबिक नातेसंबंध होते. पंतप्रधानांशी देखील जे आमचे वैयक्तिक नातेसंबंध आहेत, असं सांगत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवावं. वैयक्तिक संबंध वेगळे ठेवावेत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे.