मुंबई : काल मध्य रात्री चार मजली घराचा भाग कोसळला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. वांद्रेच्या खेरवाडी परिसरातील रझाक चाळीतील ही घटना आहे. रझाक चाळीत दाटीवाटीने घरं बनवलेली आहे. शिवाय त्यांचं बांधकामही फारसं मजबूत नाही. आतापर्यंत 17 जणांना वाचवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान ढिगारा हटवण्याचं काम करत आहेत. ढिगाऱ्याखाली कोणी अडकलेले नाही ना याची खातरजमा केली जात आहे.
Maharashtra | One died, four persons injured after part of a building collapsed in the Bandra area of Mumbai. The injured have been admitted to a hospital. Officials of fire and police department present at the spot, says Congress MLA Zeeshan Siddique pic.twitter.com/F0Q0vB7GCr
— ANI (@ANI) June 7, 2021
मुंबईत रात्री उशिरा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली त्याबरोबरच इमारती दुर्घटनाही घडली आहे. वांद्रेमधील खेरवाडी परिसरातील रझाक चाळीत चार मजली घराचा भाग कोसळला. त्यात एका तरुणाचा मृत्यु झाला असून चौघे जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
साडेतीन एकरामध्ये पसरलंय हे 300 वर्षाचे जुने अनोखे वडाचे झाड https://t.co/Wg6bU3OCrf
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वांद्रे पश्चिम रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या रझाक चाळीत दाटीवाटीने घरे बनवलेली आहे. जिथे घराचा भाग कोसळला ती जागा अतिशय चिंचोळी आहे. दुर्घटना घडली. त्यावेळी मुंबईत जोरदार पाऊसही सुरु होता. परिणामी अग्निशमन दलाच्या जवानांना ढिगारा हटवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.
Update on the Bandra East Structure collapse-
It’s past 6 am now, locals have formed human chains & are helping fire brigade clear the debris to make sure no one is stuck. Have been requesting the @mybmc since 3 hours now to send labourers but only 2 are on site. pic.twitter.com/uoiry1jwew— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) June 7, 2021
अग्निशमन दलाचे जवान ढिगारा हटवण्याचे काम करीत आहेत. ढिगार्याखाली कोणी अडकलेले नाही ना याची खातरजमा केली जात आहे.
मुंबईत 4 मजली इमारतीचा भाग कोसळला, एक मृत तर चार जखमी #surajyadigital #mumbai #सुराज्यडिजिटल #मुंबई pic.twitter.com/qVJApJnqaw
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
अपघातानंतर येथील आमदार झिशान सिद्दीकी यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांनी सांगितले की, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून त्यात एकाचा मृत्यु झाला आहे. चार जण जखमी झाले असून जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
"कोरोनाला रोखण्यासाठी हवन करा, मी रोज करते"; ड्रीमगर्ल, खासदार हेमा मालिनींचा खुलासाhttps://t.co/XBq8yjUQqy
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
पाऊस सुरु असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून परिसरातील वीज पुरवठा तात्पुरता खंडीत करण्यात आला आहे. स्थानिक तरुणांनी मानवी साखळी करुन ढिगारा हलविण्यासाठी अग्निशामन दलाला मदत करत आहेत.
ड्रीमगर्ल हेमा मालिनी कोरोनापासून वाचण्यासाठी करतायत दिवसातून दोनदा घरात होमहवन #हेमामालिनी #dreamgirl #HemaMalini #actresses #surajyadigital #सुराज्यडिजिटल #homehawan #होमहवन #कोरोना #coronavirushttps://t.co/JbSQnTytLr
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021