नवी दिल्ली : आपण जुन्या आणि विशाल वडाच्या झाडांबद्दल ऐकले असेल, अशी काही झाडे पाहिलीही असतील, पण पंजाबच्या फतेहगढ साहिब जिल्ह्यातील एका गावात आत्तापर्यंत हिरवेगार असलेले 300 वर्षे जुने एक वडाचे झाड सर्वांनाच चकित करते. या झाडाच्या आश्रयाने अनेक पक्षी, प्राणी आणि जंगली जीव राहतात. गावातल्या आणि आसपासच्या लोकांचेही या झाडाशी एक नाते आहे.
अभिनेता संजय दत्तने घेतली गडकरी आणि नितीन राउतांची भेट https://t.co/nM4F1BzGQ2
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021
या झाडामुळे फतेहगढ साहिब जिल्ह्याच्या चोल्टी गावाला फक्त देशातच नाही, तर जगभरात एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. या गावांतले लोक या झाडाची खूप काळजी घेतात. नुकतेच होऊन गेलेल्या पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने याविषयी बोलणे, जाणून घेणे हे महत्त्वाचे आहे कारण एकीकडे जंगलांवर कुऱ्हाडी चालवल्या जात आहेत तिथेच काही गावे अशीही आहेत जी आपल्या झाडांची, जंगलांची काळजी घेत आहेत. चोल्टी गावातल्या या वडामुळे इथली जैवविविधताही टिकून आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
"कोरोनाला रोखण्यासाठी हवन करा, मी रोज करते"; ड्रीमगर्ल, खासदार हेमा मालिनींचा खुलासाhttps://t.co/XBq8yjUQqy
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
पंजाबच्या बहुतेक भागांमधून लुप्त होत असलेल्या मोर, घुबड, साप, मॉनिटर पाल, बागेतली पाल, किडे, मिलिपीड अशा अनेक प्रजातींचा समावेश आहे, त्यांचा या झाडावर निवास आहे. गावाच्या पंचायतीने या कल्पवृक्ष वृक्षाच्या जागेला जैवविविधता हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे जेणेकरून पंजाब बायोडायव्हर्सिटी बोर्ड याचे संरक्षण आणि व्यवस्थापन करू शकेल.
ड्रीमगर्ल हेमा मालिनी कोरोनापासून वाचण्यासाठी करतायत दिवसातून दोनदा घरात होमहवन #हेमामालिनी #dreamgirl #HemaMalini #actresses #surajyadigital #सुराज्यडिजिटल #homehawan #होमहवन #कोरोना #coronavirushttps://t.co/JbSQnTytLr
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
जिथे पूर्ण देशात प्राणवायूसाठी धडपड चालू आहे, प्राणवायूच्या कमतरतेमुळे जिथे लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे तिथे प्राणवायूचे प्रमुख स्रोत असलेल्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही ठोस योजना देशात अस्तित्वात नाही. काही गावांमध्ये मात्र लोक विश्वास आणि समर्पणभावनेने अशा झाडांचे रक्षण करत आहेत.