मुंबई : काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीतला तपशील अद्याप समोर आला नाही. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आम्हाला विश्वासात न घेता पदोन्नती आरक्षणाचा निर्णय घेतला, असा आरोप काँग्रेसचे मंत्री नितीन राऊतांनी केला होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संबंध ताणले गेले आहेत.
महाराष्ट्राचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी आज आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.@PawarSpeaks @bb_thorat pic.twitter.com/dNLzcAADnW
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 7, 2021
मागील आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेला भेटीगाठींचा सिलसिला अद्याप सुरूच आहे. आता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ट्वीटर हँडलवर दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. थोरात यांनी पवारांची सदिच्छा भेट घेतल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मात्र, या भेटीवरून पुन्हा एकदा वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले असतानाच फडणवीस यांनी मागील आठवड्यात अचानक शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर फडणवीस थेट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी पोहोचले होते. फडणवीस यांच्या या भेटींमुळं चर्चा सुरू असतानाच, एकनाथ खडसे यांनी मुंबईतील निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली होती. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यामुळं नेमकं काय चाललं आहे, याबाबत राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता.
"कोरोनाला रोखण्यासाठी हवन करा, मी रोज करते"; ड्रीमगर्ल, खासदार हेमा मालिनींचा खुलासाhttps://t.co/XBq8yjUQqy
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सध्या अनेक विषयांवरून कुरबुरी आहेत. निधी वाटपाविषयीची काँग्रेसची तक्रार जुनीच आहे. त्यातच पुढील विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. २०२४ साली राज्यात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीतील पक्षांच्या अशा आक्रमक भूमिकेमुळे राज्यात वेगळा संदेश जात आहे. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी घेतलेली पवारांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
ड्रीमगर्ल हेमा मालिनी कोरोनापासून वाचण्यासाठी करतायत दिवसातून दोनदा घरात होमहवन #हेमामालिनी #dreamgirl #HemaMalini #actresses #surajyadigital #सुराज्यडिजिटल #homehawan #होमहवन #कोरोना #coronavirushttps://t.co/JbSQnTytLr
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021