मुंबई : देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यातच बॉलिवूड अभिनेत्री आणि मथुराच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी करोनापासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी एक वेगळाच पर्याय सुचवला आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, नुकतेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हेमा मालिनी यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. वातावरण स्वच्छ आणि कोरोनासारख्या अनेक आजारांपासून स्वत: ला वाचवण्यासाठी त्यांनी लोकांना घरी ‘हवन’ करण्यास सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या हवनसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी वापरायच्या हे देखील हेमा मालिनी यांनी सांगितले आहे. त्या म्हणाल्या, “मी गेल्या अनेक वर्षांपासून पुजा झाल्यानंतर हवन करते. आणि कोरोनाचा संसर्ग आल्यापासून मी दिवसातून दोनदा हवन करते. यामुळे वातावरण फक्त शुद्ध होतं नाही तर पवित्र वाटतं आणि कोरोना सारख्या संसर्गाला आपल्यापासून दूर ठेवते.” या हवनसाठी धूप, कडुलिंबाची पानं, लवंग, मोहरी, मीठ आणि तुपाचाही वापर करण्यास त्यांनी सांगितलं आहे.
ड्रीमगर्ल हेमा मालिनी कोरोनापासून वाचण्यासाठी करतायत दिवसातून दोनदा घरात होमहवन #हेमामालिनी #dreamgirl #HemaMalini #actresses #surajyadigital #सुराज्यडिजिटल #homehawan #होमहवन #कोरोना #coronavirushttps://t.co/JbSQnTytLr
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
त्यापुढे म्हणाल्या, “आज संपूर्ण जग हे करोना सारख्या भयानक संसर्गाचा सामना करत आहे. मी सगळ्यांना विनंती करते की फक्त जागतिक पर्यावरणा दिनानिमित्त नाही तर जो पर्यंत आपण कोरोना संसर्गावर मात करत नाही तो पर्यंत रोज हवन करा. याच्याशी कोणत्याही धर्म किंवा जातीचा संबंध नाही.