सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राहुल वैजिनाथ बोराडे (वय ३६, रा. विजय देशमुख नगर, विजापूर रोड सोलापूर) यांचे निधन झाले. कोरोनानंतर फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने निधन झाले.
सोलापूर शहरात गेल्या 24 तासात एकही कोरोना बळी नाही, पण ग्रामीणमध्ये 18 बळी https://t.co/iYwnfvyAzR
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021
राहूल बोराडे यांच्या निधनाने सोलापूर पोलीस दलात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांना कोरोना झाल्यानंतर तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, परंतु कोरोनानंतर फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. फौजदार राहूल बोराडे हे काही महिन्यापूर्वीच सोलापूर पोलीस आयुक्तालयात रुजू झाले होते. अवघ्या ३६ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी साधला आष्टीच्या सरपंचाशी संवाद, जिल्हा परिषदेच्या कोरोनामुक्त गाव अभियानाचे कौतुक
https://t.co/cu11Q5AZNe— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021