नवी दिल्ली : आयकर विभागाची नवीन वेबसाईट सोमवारी रात्री लाँच करण्यात आली. मात्र, करदात्यांनी वेबसाईट क्रॅश होत असल्याचे फोटो ट्विटरवर टाकले होते. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवर इन्फोसिस आणि कंपनीचे सह संस्थापक अध्यक्ष नंदन निलेकनींना चांगलेच सुनावले आहे. अशाप्रकारची असुविधा पुन्हा करदात्यांना होता नये, करदात्यांना चांगली सेवा देणे आपली प्राथमिकता असायला हवी, असे त्या म्हणाल्या.
आरोग्य विभागात मेगा भरती; 2,226 पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी https://t.co/vZc46WsuXy
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021
मोठा गाजावाजा करून आणि सहा दिवस सर्व्हर बंद ठेवून आयकर विभागाची नवीन वेबसाईट सोमवारी रात्री लाँच करण्यात आली होती. ई-फायलिंग पोर्टल 2.0 सोमवारी रात्री 8.45 मिनिटांनी लाँच करण्यात आले. या नव्या वेबसाईटवर आयकर विभागाने वेगवेगळ्या सुविधा दिल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
The much awaited e-filing portal 2.0 was launched last night 20:45hrs.
I see in my TL grievances and glitches.
Hope @Infosys & @NandanNilekani will not let down our taxpayers in the quality of service being provided.
Ease in compliance for the taxpayer should be our priority. https://t.co/iRtyKaURLc
— Nirmala Sitharaman (Modi Ka Parivar) (@nsitharaman) June 8, 2021
यामध्ये तुमचा पॅन नंबर टाकल्यानंतर तुमच्या अकाऊंटला तुमची सारी माहिती आपोआपच लोड होणार आहे. अशा अनेक सुविधा या वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत. मात्र, ही वेबसाईटच सुरु होण्यास समस्या येऊ लागल्याने अनेकांनी याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तक्रार केली होती.
मी काही नवाझ शरीफांना भेटायला गेलो नव्हतो – उद्धव ठाकरे; विधानपरिषदेच्या 12 जागांचा प्रश्न पंतप्रधानांच्या कोर्टातhttps://t.co/EsXqWu7olF
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021
यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट इन्फोसिस आणि नंदन निलेकनींना टॅग करत चांगलेच सुनावले आहे. त्यांनी अशाप्रकारची असुविधा पुन्हा करदात्यांना होता नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. करदात्यांना चांगली सेवा देणे आपली प्राथमिकता असायला हवी, असे त्या म्हणाल्या.