सोलापूर : शहरातील स्मार्टसिटी योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामावरील ट्रॅक्टरच्या खाली चेंगरून एका शाळकरी मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास सोलापूर शहरातील दत्त चौकात घडली.
मुंबईत इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी https://t.co/acr2dpt60m
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
सोलापूर शहरात स्मार्टसिटीची सर्वत्र अर्धवट असलेली कामं, झालेली खोदाई, न बुजवलेले खड्डे, त्यातच अनलॉकमुळं शहरात वाढलेली वर्दळ आणि अस्ताव्यस्त पार्किंग याचा बळी ठरला. दत्तचौक ते लक्ष्मी मार्केट रस्त्यावर शुभराय टॉवर समोर हा अपघात घडला.
समर्थ धोंडीबा भास्कर ( वय १३, उत्तर कसबा, पंजाब तालीम, सोलापूर) असे ट्रॅक्टरखाली चेंगरून ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेतून विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चहावाल्याकडून मोदींना दाढी कटिंग करण्यासाठी १०० रुपयांची मनीऑर्डर, वाचा त्या चहावाल्याने पाठवलेले पत्र https://t.co/HuFtZVWFc1
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
स्मार्टसिटी योजनेत रस्त्याचं काम या परिसरात गेली दीडवर्ष सुरु आहे. यासाठी आजोरा आणि मजूर घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून सायकलवर निघालेला समर्थ जागीच ठार झाला.
ट्रॅक्टर आणि सायकल चालक दोघेही लक्ष्मीमार्केटच्या दिशेनं निघाले होते. ट्रॅक्टरला एक ट्रॉली होती. ट्रॅक्टरचं मागील चाक आणि ट्रॉली याच्यामध्ये सापडून सायकलस्वार चाकाखाली चिरडला गेला. अनेकांनी हा अपघात पाहिला. सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलीसांना बोलाविण्यात आलं. तोपर्यंत परिसरात मोठी गर्दी झाली होती.
…त्यामुळे राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, शरद पवारांच्या भाषणाचे अनेक अर्थ https://t.co/l6oEg3tjov
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
दरम्यान स्मार्टसिटीचं कामं अर्धवट आणि बेशिस्त आहे. शहरात अपघात वाढलेत आजच्या अपघात प्रकरणी स्मार्टसिटीचे त्र्यंबक डेंगळे – पाटील यांच्या विरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयास पाठविण्यात आले. या घटनेचा पुढील तपास फौजदार चावडी पोलीस ठाणे करीत आहे. पोलीसांनी ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतलं आहे. तो देगांव येथील रहिवासी आहे. फौजदार चावडी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार संबोधित करताना #ncp #surajyadigital #sharadpawar #राष्ट्रवादीhttps://t.co/7UwVW6JSZs
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021