मुंबई : सलग 15 वर्ष सत्तेत होतो मग त्यानंतर सत्ता गेली. त्या काळात काही नेत्यांनी पक्ष सोडला पण त्यामुळे अनेक नवीन नेतृत्व तयार झालं. त्या आधी त्यांचं कतृत्व कधी दिसलं नाही पण या आता ते जबाबदारीने आपलं काम करत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
मुंबईत इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी https://t.co/acr2dpt60m
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
आजच्या दिवशी 22 वर्षांपूर्वी संघटना उभी करण्याची भूमिका स्वीकारली, ती कितपत योग्य होती याचा आढावा घ्यायचा आजचा दिवस आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते म्हणाले की, सत्ता ही केंद्रीत व्हायला नको. तसं झालं तर ती भ्रष्ट होते. सत्ता ही अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला आपण या सत्तेचा भाग असल्याची जाणीव झाली पाहिजे. आज राष्ट्रवादीचा प्रवास बघता, पक्षाने महाराष्ट्रात नेतृत्वाची फळी निर्माण केली आहे.
सत्ता गेल्यानंतर काही लोक गेले पण नवीन नेतृत्व तयार झाल्याचं सांगत शरद पवार म्हणाले की, आजचं मंत्रिमंडळ बघितलं तर अनेक सहकारी जबाबदारी पेलत आहे. त्यांचे कर्तृत्व या आधी दिसलं नव्हतं. कोरोना काळात राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी केलेल्या कामाची स्तुती शरद पवार यांनी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार संबोधित करताना #ncp #surajyadigital #sharadpawar #राष्ट्रवादीhttps://t.co/7UwVW6JSZs
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
इंदिरा गांधी यांना दिलेला शब्द बाळासाहेब यांनी पाळला होता असं सांगत शरद पवार म्हणाले की, इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी सेनेने एक उमेदवार दिला नाही, बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता तो पाळला हा इतिहास आहे. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन, 22 वर्षात 16 वर्षापासून सत्तेत असलेला पक्ष #surajyadigital #सुराज्यडिजिटल #NCP #ncpmaharashtra #राष्ट्रवादी #सत्ता #वर्धापन #22years #16years #SharadPawar pic.twitter.com/cjvpd8vGar
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
चहावाल्याकडून मोदींना दाढी कटिंग करण्यासाठी १०० रुपयांची मनीऑर्डर, वाचा त्या चहावाल्याने पाठवलेले पत्र https://t.co/HuFtZVWFc1
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
* शरद पवारांच्या भाषणाचे अनेक अर्थ
आपण महाविकास आघाडीचा पर्याय दिला, लोकांनी तो पर्याय स्वीकारला. आजच्या घडीला महाविकास आघाडी सरकार उत्तमरित्या काम करत असल्याचंही शरद पवार म्हणाले. येणारी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
शरद पवार यांच्या आजच्या भाषणाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यांनी आजच्या भाषणातून एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. त्यामुळे पवारांचं आजचं भाषण चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.
एक तर मोदी-ठाकरे वैयक्तिक भेटीची त्यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. त्यानंतर भेटीमुळे दोन्ही पक्ष जवळ येणार असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचं अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं आहे. तसेच या चर्चेला पूर्णविरामही दिला आहे.
दुसरं म्हणजे शिवसेना हा सर्वात विश्वास असणारा पक्ष असल्याचं सांगून भाजपकडून झालेल्या फसवणुकीची शिवसेनेला अप्रत्यक्ष आठवणही करून दिली आहे. त्याशिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यातून आम्ही निवडणुकीत आघाडी करण्यास तयार असल्याची ऑफरच पवारांनी सेनेला दिली आहे. तसेच निवडणुकीत आघाडी करण्यावरून बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचीही कोंडी केली आहे, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.
खरीप पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ, पहा पिकांची सविस्तर किंमत https://t.co/Kby0OXtRdo
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021