सोलापूर / श्रीपूर : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा अंतर्गत जमीन कसायला दिलेल्या शेतकरी जमीन सुपीक व लेव्हल करत असताना, जमीन नांगरट करतं असलेल्या त्या जमीनीत मानवी सांगाडे सापडले आहेत. सदर सांगाडे कवठी हाडे ठिसूळ झालेल्या अवस्थेत नांगरणी करताना सापडले आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सोलापुरात स्मार्टसिटीच्या ट्रॅक्टरखाली चेंगरून दत्तचौकात बालकाचा मृत्यू https://t.co/dkJesgLkRg
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
तीस चाळीस वर्षांपूर्वी या भागात रहाणारे लोक मयत व्यक्तींना शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा अंतर्गत पडिक जागेत दफन करत असावेत, असा कयास लावण्यात येत आहे. शेती महामंडळातील कामावर असणारे स्थानिक कामगार या परिसरात रहायला होते. त्याकाळी पक्की स्मशानभूमी नसल्याने व सुमारे पन्नास वर्षांपूर्वी गोरगरीब अशिक्षित मजूर मयत व्यक्तींना पुरत असत. त्यातीलच हे सांगाडे असावेत, असे बोलले जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माढा तालुक्यातील सापटणे येथील ढवळे पाटील यांनी शेती महामंडळाकडून सुमारे अडीचशे एकर जमीन संयुक्तीक करारांवर पुणे येथील हेड ऑफिसमध्ये पैसे भरुन जमीन कसायला सुरुवात केली आहे. मात्र सदर जमीन नांगरताना हा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी श्रीपूर पोलिस चौकीचे पोलिस कर्मचारी धनाजी झगडे – गायकवाड बंदोबस्तास उपस्थित होते. मानवी सांगाडे सापडले याची चर्चा परिसरात झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
लस घेतल्यानंतर शरीरात आले चुंबकत्व, आरोग्य तज्ज्ञांनी दावा फेटाळला https://t.co/PIpCUgsdZr
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
* दहा गुंठे जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित ठेवा
घटनास्थळी वंचित बहुजन आघाडी श्रीपूर येथील कार्यकर्ते यांनी समक्ष भेट दिली व पहाणी केली. “मानवी सांगाडे आहे त्या जमिनीत व्यवस्थीत दफन करा, यातील दहा गुंठे जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित ठेवण्यात यावी”, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मात्र शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा येथील कर्मचारी भालचंद्र शिंदे सुरक्षा रक्षक विलास महाडीक यांनी “तुमचे म्हणणे पुणे येथे हेड ऑफिसला कळवा, आम्हाला येथे काही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हेड ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील” अशी माहिती दिली. या परिसरात रहाणारे व पूर्वी शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळ्यात काम करणाऱ्या येथील रहिवाशांना रहाण्यासाठी ही आठ एकर जमीन द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी केली आहे.
पुणे हेड ऑफिस येथून पुढील निर्णय येईपर्यंत या क्षेत्रावर ढवळे पाटील यांनी ताबा घेऊ नये, असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. आता पुणे हेड ऑफिसमधून काय निर्णय व आदेश येतोय याकडे स्थानिक रहिवासी यांचे लक्ष लागले आहे.
…त्यामुळे राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, शरद पवारांच्या भाषणाचे अनेक अर्थ https://t.co/l6oEg3tjov
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021