मुंबई : मुंबई शहरासह पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे 3 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या तीन दिवसात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सोलापुरात जमीन लेव्हल करताना सापडले मानवी सांगाडे https://t.co/Txn3xLBaLT
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
मान्सूनने आल्या आल्या आपले रंग दाखवायला सुरुवात केली असून मुंबईसह कोकण किनारपट्टीतही येत्या पाच दिवसांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मान्सून आपले रौद्ररुप दाखवत असल्याने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने याआधीच बुधवार 9 मार्चपासून मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याचा अंदाज अचूक निघत असून आपत्ती यंत्रणेला सज्ज होण्यास मदत मिळत आहे. मुंबई आणि कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाले. अनेक ठिकाणी तर धुवाँधार पाऊस पडला. कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी बुधवारी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्याअधिकारी शुभांगी भुते यांनी या संदर्भातली माहिती दिली.
लस घेतल्यानंतर शरीरात आले चुंबकत्व, आरोग्य तज्ज्ञांनी दावा फेटाळला https://t.co/PIpCUgsdZr
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाला जोर आला आहे. मंगळवार रात्रीपासून मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली आणि बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळायला सुरुवात झाली. पावसाचा जोर बहुतांशी ठिकाणी संध्याकाळपर्यंत कायम होता. तसेच 12 जूनपर्यंत राज्यात पावसाचा असाच जोर कायम राहणार आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन करत आहे.
पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची तुंबई झाली. रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मध्य व हार्बर रेल्वेची वाहतूक कुर्ला ते सीएसएमटी, वाशी दरम्यान ठप्प झाली. नागरिकांचे खूप हाल झाले. मिठी व इतर नद्या, नाले तुडुंब झाले. हिंदमाता, किंग्ज सर्कल आदी नेहमीच्या सखल भागात गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पोलखोल झाली आहे.
विरोधी पक्षनेत्यांचा दे धक्का ! #mumbai #surajyadigital #Pravindarekar #dedakh #सुराज्यडिजिटल #देधक्का #rain
मुंबई : सायन येथे पाण्यात फसलेल्या बसला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी धक्का दिला. पहिल्या पावसाने तुंबई झाल्याने टीका होत आहे. pic.twitter.com/pnUJxWZ3qk— Surajya Digital (@SurajyaDigital) June 9, 2021
नालेफसफाई कामांची चौकशी झाल्यास कंत्राटदार व पालिका अधिकारी यांचे नालेसफाईच्या कामात संगनमत होते की नाही, नेमकी नालेसफाई झाली का, किती प्रमाणात झाली, गाळ कुठे टाकला, त्याचे पुरावे काय याबाबतची पोलखोल होणार आहे. दरवर्षी जर नालेसफाई कामावर कोट्यवधी रुपये खर्चूनही मुंबईची तुंबई होणार असेल तर हवी कशाला नालेसफाई असा संतप्त सवाल उद्या मुंबईकरांनी उपस्थित केला तर पालिका प्रशासन ,कंत्राटदार आणि सत्ताधारी यांची अडचण वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
रणनीतीकार प्रशांत किशोर शरद पवारांची भेट घेणार #प्रशांतकिशोर #surajyadigital #PrashantKishor #SharadPawar #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/g5cNYrIDur
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021