इस्लामाबाद : कोरोनाने जगभरात थैमान घातले असतानाही गैरसमजामुळे अनेकजण कोरोना लस घेत नाहीयंत. पाकिस्तानमध्येही अशीच स्थिती आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील स्थानिक सरकारने कोरोना लस न घेणाऱ्या नागरिकांचे सिम कार्डच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ. यासमीन रशीद यांच्या अध्यक्षतेखाली लाहोरमध्ये झालेल्या बैठकीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना हा आदेश देण्यात आला.
लस घेतल्यानंतर शरीरात आले चुंबकत्व, आरोग्य तज्ज्ञांनी दावा फेटाळला https://t.co/PIpCUgsdZr
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
पाकिस्तानने चीनच्या मदतीने देशात लस उत्पादन सुरू केले आहे. त्याची पहिली खेप काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आली. पाकिस्तानने आपल्या लशीचे नाव ‘पाकवॅक’ असे ठेवले आहे. पाकिस्तान लसीकरणासाठी पाकवॅकसह चीनकडून आणि कोवॅक्स योजनेतून मिळणाऱ्या लशींवर अवलंबून असल्याचे म्हटले जाते.
कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी विविध प्रलोभने दाखवण्यात येत आहेत. मात्र, पाकिस्तानमध्ये थेट सिम कार्ड ब्लॉक करण्याची धमकी सरकारने दिली आहे. पंजाब सरकारने याबाबतची घोषणा केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
In an unconventional move to tackle vaccine hesitancy, the provincial government in #Pakistan’s , #Punjab has decided to block SIM cards of all those citizens who refuse to get themselves vaccinated against Covid-19.#COVID19 #simcard #vaccination
— News Updates (@News_Updates_24) June 11, 2021
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पंजाब प्रांताचे आरोग्यमंत्री डॉ. यास्मीन रशीद यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार, कोरोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्या व्यक्तींचे सिम कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहे. या बैठकीत नागरी आणि लष्करी सेवांमधील अधिकारी उपस्थित होते. येत्या १२ जूनपासून १८ वर्षांवरील लोकांसाठी ‘वॉक-इन वॅक्सीनेशन’ प्रमाणे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत पाकिस्तानने ७० दशलक्ष लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
चहावाल्याकडून मोदींना दाढी कटिंग करण्यासाठी १०० रुपयांची मनीऑर्डर, वाचा त्या चहावाल्याने पाठवलेले पत्र https://t.co/HuFtZVWFc1
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
सरकारच्यावतीने धार्मिक स्थळांबाहेर लसीकरण केंद्र, शिबीर सुरू करण्यात येणार आहे. लसीकरणात कर्करोग आणि एड्सबाधित व्यक्तींना प्राथमिकता दिली जाणार आहे. सरकारने सांगितले की, लस घेतल्यानंतरच लोकांना सिनेमा, रेस्टॉरंट्स आणि विवाहसोहळ्यांमध्ये उपस्थित राहता येणार आहे.
ऑनलाईन शुभारंभ, जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दसपट दर https://t.co/R85sP0MKDq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021