गडचिरोली : जिल्ह्यातील जांभूळ विक्रीला ऑनलाईन शुभारंभ झाला आहे. शेतकऱ्यांमध्ये दसपट दर मिळाल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीच्या जांभळांची दसपट दरात विक्री होत आहे. जांभूळ उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्धार केला आहे.
आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, 20 बसमधून येणार मानाच्या 10 पालख्या https://t.co/Juy9rLG9ke
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
दरवर्षी जांभूळ 10 रुपये किलोनं विक्री केलं जायचं. यंदा मात्र 100 रुपये किलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. वंदना अॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे जांभूळ विक्री करण्यात येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीद्वारे जांभूळ विक्री करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्याला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्याचा निर्धार देखील एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
#गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथील जांभूळ उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा निर्धार करत जांभळाला उत्तम दर प्राप्त व्हावा यासाठी आज ऑनलाइन माध्यमाद्वारे नागपुरात जांभूळ विक्रीस प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशीच ऑनलाइन विक्रीमध्ये या जांभळांना दसपट दरात विक्री झाली. pic.twitter.com/T7EydKEsJp
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 10, 2021
गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील जांभळाला नागपूर सारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर मध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत जांभूळ विक्रीला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे पहिल्याच दिवशी गडचिरोलीच्या जांभळांना दसपट किंमत मिळाली. जांभूळ विक्रीतून आदिवासी शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
अलर्ट! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस धोक्याचे https://t.co/0nZ01DthND
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
कोरची तालुक्यात जांभळाचे वन आहे. येथील जाभळांना संपूर्ण राज्यभर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जांभळाची शेती करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच याठिकाणी प्रक्रिया उद्योग देखील सुरू करण्यात यावा, असे एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी सांगितले होते.