ग्वाल्हेर : भाजपचे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसून आले आहे. ग्वाल्हेर येथे एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा थांबवून त्यांना बेशरमाची फुलं आणि सुताची माळ दिल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार घडला तेव्हा पोलीसही केवळ बघतच उभे होते, असे वृत्त आहे.
मराठा आरक्षणासाठी आता गुळगुळीत आंदोलन नको, मंत्र्यांच्या गाड्या फोडा, मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? https://t.co/4EruBnYNVt
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
ज्योतिरादित्य यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या घटनेनंतर भाजप नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारची सुरक्षा असलेल्या लोकांची सुरक्षा यंत्रणा सक्रिय असते आणि आधीच, अशा घटनांची माहिती मिळवते. मात्र या वेळी पोलीस फक्त बघतच होते. विशेष म्हणजे शिंदेंसोबत असा प्रकार त्यांच्याच शहरात घडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा झाली? राष्ट्रवादीचा खुलासा, पहा व्हिडिओhttps://t.co/boMdwxaLrW
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
शिंदेंचा ताफा एअरपोर्टवर पोहोचणारच होता, मात्र, तेवढ्यात गोला चौराहा येथे जवळपास 20 ते 22 लोकांनी त्यांचा ताफा रोखला आणि त्यांना निवेदन देण्याच्या बहाण्याने बेशरमाची फुलं आणि माळ दिली. खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजप कार्यकर्ते समजून आपली गाडी थांबवली होती. मात्र, निवेदन देणारे लोक एनएसयूआयचे कार्यकर्ते आहेत, हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी सुताची माळ घेतली, तथाकथित निवेदनाचा कागदही घेतला.
मात्र, बेशरमाची फुलं एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना परत केली. शिंदेनी सुताची माळा आपल्या सुरक्षा रक्षकांकडे दिली. तर एनएसयूआयचे निवेदन आपल्या जवळच ठेवले आणि शिंदेचा ताफा एअरपोर्टकडे रवाना झाला.
प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नव्हे, पेशवाईला फटका, भाजपची मोठी लिस्ट तयारhttps://t.co/j5oEOQCZlf
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021