बंगळुरु : आता ड्रोनद्वारे औषधांची घरोघरी डिलिव्हरी केली जाणार आहे. बंगळुरू येथील थ्रॉटल एरोस्पेस सिस्टम्स या कंपनीला नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून वस्तू ड्रोनच्या सहाय्याने डिलीव्हर करण्यासंबंधीची परवानगी देण्यात आली आहे. यासाठीच्या ट्रायलची सुरुवात बंगळुरुपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या गौरीबिदनूरमध्ये होत आहे. या प्रयोगात यश मिळाल्यास आपल्याला थेट ड्रोनच्या मदतीने औषधे घरपोच मिळणार आहेत.
E-commerce website @Flipkart has partnered with #Telangana government to lead medicine from #sky_Project.
This project will help To deliver "Medical Supplies" Using Drones. pic.twitter.com/n5dV6PBFiv— Lawtantra.org (@lawtantra) June 13, 2021
औषधांची डिलीव्हरी करण्याच्या प्रयोगाची पहिली ट्रायल ही बंगळुरुपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या गौरीबिदनूरमध्ये सुरू होणार आहे. या प्रयोगात यश मिळाल्यास आपल्याला थेट ड्रोनच्या मदतीने औषधे घरपोच मिळणार आहेत. बेंगळुरू येथील थ्रॉटल एरोस्पेस सिस्टम्स या कंपनीला मार्च 2020 मध्ये नागरी उड्डाण महासंचालनालय कडून वस्तू ड्रोनच्या सहाय्याने डिलीव्हर करण्यासंबंधीची परवानगी देण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीमुळे इतर काही परवानग्या न मिळाल्याने हा प्रयोग रखडला होता.
विहिरीवरील आरसीसी पावसामुळे खचली, बघता – बघता कार बुडाली, पहा व्हायरल व्हिडिओ https://t.co/mevWWCQT4p
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021
आता या संस्थेला आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्यानंतर 18 जूनपासून 30-45 दिवसांमध्ये चाचण्यांचा पहिला सेट पार पाडणार आहे. प्रख्यात कार्डियाक सर्जन डॉ. देवी शेट्टी यांनी या चाचण्यांना पाठिंबा दर्शविला असून नारायण हेल्थ हे टीएएसबरोबर भागीदारी करणार आहेत. या चाचण्या दरम्यान वाहतुकीसाठी वापरले जाणारी औषधे त्यांच्याकडून पुरवली जाणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विहिरीवरील आरसीसी पावसामुळे खचली, बघता बघता कार बुडाली
मुंबई : घाटकोपर पश्चिममधील कामा लेन येथील त्रिभुवन मिठाईवाला याच्यापाठीमागे रामनिवास या जुन्या सोसायटीतील विहिरीवर हा प्रकार घडला. #car #mumbai #कार #घाटकोपर #विहिर #पाऊस #rain pic.twitter.com/9bUNFaEFHF— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021
टीएएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेन्द्रन कंदासामी यांनी सांगितले की, इतर दोन कॉन्सोर्सियांना देखील या चाचण्या घेण्यास परवानगी मिळाली आहे, पण आमचा प्रयोग हा पहिला अधिकृत आणि कायदेशीर प्रयोग असेल. यात 2016 पासून आम्ही बरीच प्रगती केली असून बऱ्याच प्रतीक्षेनंतर आम्हाला बीव्हीएलओएस प्रयोग मॉनिटरींग कमिटीकडून या प्रयोगांसाठी परवानगी मिळाली आहे आणि भारतात लवकरच व्यावसायिक ड्रोन डिलीव्हरीचा फायदा घेण्यास उत्सुक आहोत.
कंदासामी यांनी स्पष्ट केले की नारायण हेल्थची भागीदारी ही ड्रोनच्या सहाय्याने कोणत्या प्रकारच्या औषधांची वाहतूक केली जाऊ शकते, कोणती आव्हाने असू शकतात आणि भविष्यातही याचा नियमित वापर केला जाऊ शकतो की नाही हे समजून घेण्यासाठी असेल. आमच्या सॉफ्टवेअरला नारायण हेल्थकडून करण्यात आलेली मागणीचा प्राप्तकर्ता कोण आहे हे कोणालाही माहिती होणार नाही, परंतु डिलीव्हरी ही आधी लोड केलेल्या पत्त्यावर केले जाईल, असे कंदासामी यावेळी स्पष्ट केले.
अक्कलकोटमध्ये भरदिवसा तरुणाचा निघृण खून; पाच गंभीर जखमी, सहाजणांना अटक
https://t.co/xghJ8VWOID— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021
* अशी होईल औषधांची डिलीव्हरी
या प्रयोगांदरम्यान कन्सोर्टियम त्यांच्या ड्रोनचे दोन व्हेरियंट वापरेल. मेडकोप्टर आणि टीएएस ऑन डिमांड सॉफ्टवेअर रेनडिंट हे या प्रयोगादरम्यान वापरले जाईल. यापैकी लहान व्हेरियंट असलेले मेडकोप्टर हा ड्रोन 1 किलो वजन 15 किलोमीटर अंतरापर्यंत घेऊन जाऊ शकतो तर दुसरा व्हेरियंट हा 2 किलो वजन 12 किलोमिटर अंतरापर्यंत घेऊन जातो. 30-45 दिवसांपर्यंत या ड्रोनच्या रेंज आणि सेफ्टीबद्दल चाचणी करीत आहोत. त्यादरम्यान डीजीसीएनुसार आम्हाला किमान 100 तास उड्डाण करावे लागेल. सुमारे 125 तास उड्डाण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. ट्रायलच्या शेवटी नोंदी पुनरावलोकन अधिकाऱ्यांना सादर केल्या जातील, असे कंदासामी म्हणाले.
मोदींनी 'मन की बात'मध्ये कौतुक केलेल्या शेतकऱ्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, त्यांच्या अनेक कार्याची काँग्रेसने घेतली दखलhttps://t.co/s9k9ru9fhD
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021