सोलापूर : सोलापुरात आज सोमवारी मराठा आरक्षणासंबंधात दोन बैठका झाल्या. मराठा समाज क्रांती संघटनेची बैठक डाक बंगला येथे तर सकल मराठा समाजाची बैठक छत्रपती शिवाजी प्रशालेत झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट
https://t.co/TmkZ3BPuRz— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
डाक बंगल्यात झालेल्या बैठकीत बाळीरामकाका साठे, दास शेळके, अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, सुनिल रसाळे, प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते. या बैठकीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखालीच सोलापुरातील मराठा समाजाचं आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती अमोल शिंदे यांनी दिली.
छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात देखील आंदोलन करण्याचा ठोस निर्णय दोन्ही बैठकांमध्ये घेण्यात आला. तर छत्रपती संभाजी महाराजाचा अवमान करणाऱ्याचा पुतळे जाण्याचा इशारा क्रांती मराठा मोर्चाच्या वतीने दिला.
ते म्हणाले, मध्यंतरी काही जणांनी सोलापुरात येवून मराठा समाज युवकांनी आरक्षणप्रश्नी हातात दगडं घ्यावेत असे सुचित केले. मराठा समाज शांत आहे आणि एकजुटीनं समाजाचे प्रश्न सोडवून घेवू. संभाजी महाराजांच्या नेतृत्वात हे शक्य आहे असं, मत समाजातील स्थानिक नेते मंडळींच असल्याचं बैठकीत चर्चेवेळी पुढं आलं आहे, असंही अमोल शिंदे म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुणे : खासदार उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भेटीनंतर दोघांची पत्रकार परिषद #surajyadigital #meet #सुराज्यडिजिटल #उदयनराजे #संभाजीराजेhttps://t.co/Hvrj5it6Ms
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
आरक्षणासाठी मंत्र्यांच्या गाड्या फोडा, गाड्यांवर दगडफेक करा असे विधान करत युवकांची माथी भडकावून छत्रपती संभाजी महाराजांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे षड्यंत्र काही लोकांकडून चालू आहे. याद राखा संभाजी महाराजांना बदनाम कराल तर तुमचे पुतळे जाळू असा इशारा मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक दिलीप कोल्हे यांनी यावेळी दिला.
मराठा आरक्षणासाठी आता गुळगुळीत आंदोलन नको, मंत्र्यांच्या गाड्या फोडा, मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? https://t.co/4EruBnYNVt
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
यानंतर काही वेळांनी सकल मराठा समाजाची बैठक छत्रपती शिवाजी प्रशालेत झाली. माऊली पवार, नाना काळे, सुनिल शेळके, दत्ता भोसले, राजन जाधव, रोडगे आदी या बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीवेळी डाक बंगल्यातील बैठक संपवून मराठा समाजाचे प्रमुख नेते येथे आले. मराठा समाजात दुही नको, समाजाच्या उन्नतीसाठी एकोप्यानं आपण आंदोलन करु, संभाजी महाराजांच नेतृत्व सर्व मान्य आहे, असं यावेळी सांगण्यात आलं. सकल मराठाचे माऊली पवार म्हणाले, संभाजी महाराजांच्या नेतृत्वात आंदोलन यशस्वी होईल.
लवकरच दोन्ही संघटना पत्रकार परिषद घेवून पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. समाजामध्ये जरी दोन संघटना असल्या तरी दोन्ही संघटना एकोप्याने काम करून संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.