मुंबई : तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री नायरा नेहल शाहला मुंबई पोलिसांनी ड्रग्स घेतल्याच्या आरोपात अटक केली आहे. नायरा जुहू येथे एका फाइव स्टार हॉटेलमध्ये मित्रांसोबत बर्थडे पार्टी करत होती. या पार्टीची खबर मिळताच पोलिसांनी धाड टाकली. तेव्हा नायरा चरसने भरलेली सिगारेट ओढत होती. दरम्यान, नायराची मेडीकल टेस्ट केली जाईल. यात तिच्या शरिरात ड्रग्सचे अंश मिळाले तर तिच्या अडचणीत वाढतील.
आजपासून हे बंधनकारक ! सोने विक्रीसाठी हॉलमार्क बंधनकारक https://t.co/7jnQlLizeF
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युनंतर सिनेसृष्टीभोवती ड्रग्सचं जाळ पसरलं असल्याचं उघड झालं होत. गेल्या वर्षभरात अनेक सेलिब्रिटींची या प्रकरणी नाव समोर आली होती. तर आता एका साउथ अभिनेत्रीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री नायरा नेहल शाहला मुंबई पोलिसांनी ड्रग्स घेतल्याच्या आरोपात रविवारी अटक केली आहे.
कुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट, खोट्या आकड्यांमुळे खळबळ https://t.co/cazfQpHQOC
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रिपोर्ट्स नुसार नायरा मुंबईत जुहू येथे एका फाइव स्टार हॉटेलमध्ये मित्रांसोबत बर्थडे पार्टी करत होती. तिला पार्टीची अनुमतीदेखील मिळाली नव्हती, असं समोर आलं आहे.
कोरोना पुन्हा वाढला; 19 जुलैपर्यंत ब्रिटनमध्ये कडक निर्बंध https://t.co/H4lsDLpIwA
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
पोलिसांना याची छुपी खबर मिळाली होती की पार्टीत ड्रग्स घेतले जात आहेत. व एका खोलीतून चरस वाली सिगरेट आणली गेली आहे. व अभिनेत्री देखील ती सिगरेट ओढत होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्टीत गोव्याहून आलेले नायराचे काही मित्रही होते. ते ही आता पोलिसांच्या ताब्यात आहेत.
श्रीलंकेतील दौऱ्यात राहुल द्रविड भारतीय संघाचा कोच ! https://t.co/OwUqGNmqhM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. नायराची मेडीकल टेस्ट केली जाणार आहे. जर त्यात तिच्या शरिरात ड्रग्सचे अंश मिळाले तर तिच्या अडचणीत वाढ होणार आहे.