हरिद्वार : कुंभ मेळ्याच्या काळात अनेकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. मात्र, यातील 1 लाखांवर रिपोर्ट बनावट आहेत. एकच फोन नंबर 50 नावापुढे रजिस्टर आहे. तसेच, एकाच अँटीजन किटने 700 जणांची चाचणी केली गेली. यातील पत्ते, नावंही काल्पनिक आहेत. पंजाबमधील एका व्यक्तीला हरिद्वार आरोग्य विभागाकडून कोविड निगेटिव्हचा मेसेज आला. हा व्यक्ती कुंभ मेळ्यात गेलाच नव्हता. यानंतर हे संपूर्ण प्रकरण उजेडात आलं.
#पंढरपूर #आषाढी पायी #वारी चा आग्रह धरून #भाजपा हा #वारकरी व विठ्ठल भक्तांच्या आरोग्याशी खेळ खेळत आहेत. #कुंभमेळा भरवून काय झाले हे आपण सर्वांनी पाहिले आहे.#कोरोना जात, धर्म, पंथ पाहत नाही.
जनतेचे आरोग्य हेच सर्वात महत्वाचे !
— Ramkishan Ojha (@RamkishanO) June 14, 2021
बहुतेक रिपोर्ट हे बनावट आणि खोटे असल्याचं आता उत्तराखंडच्या आरोग्य विभागाने केलेल्या प्राथमिक तपासणीत समोर आलं आहे. याबाबत 1,600 पानांचं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. कुंभ मेळ्याच्या काळात आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी तब्बल 1 लाख कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट बनावट असल्याचं यात सांगण्यात आलं आहे.
आजपासून हे बंधनकारक ! सोने विक्रीसाठी हॉलमार्क बंधनकारक https://t.co/7jnQlLizeF
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
यातीलच एक उदाहरण म्हणजे, एकच फोन नंबर तब्बल 50 लोकांच्या नावापुढे रजिस्टर करण्यात आला आहे. दुसरी बाब म्हणजे या सर्वांसाठी एकच अँटीजन कीट वापरलं गेलं असून ( याचा वापर केवळ एकदाच करता येतो) यातच 700 जणांची चाचणी केली गेली आहे. यात देण्यात आलेले पत्ते आणि नावंही पूर्णपणे काल्पनिक असल्याचं आढळलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रकाश आंबेडकर उद्या मराठा मूक आंदोलनात सहभागी होणार ! https://t.co/Jsx8wmGni0
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
अधिकाऱ्यानं याबाबत माहिती देत म्हटलं, की अनेक फोन नंबर फेक आहेत. कानपूर, मुंबई, अहमदाबाद आणि 18 इतर लोकेशनवरील लोकांनी एकसारखेच नंबर शेअर केले आहेत. आरोग्य सचिव अमित नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास अहवाल हरिद्वाराच्या डीएमकडे पाठविण्यात आला आहे. यात बरीच अनियमितता सापडली आहेत. 15 दिवसात डीएमकडून सविस्तर अहवाल मिळाल्यानंतर आम्ही कारवाई करू, असंही नेगी म्हणाले. हरिद्वारचे जिल्हादंडाधिकारी सी. रवीणकर यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करत असून पुढील सूचना येईपर्यंत सर्व एजन्सीचे प्रलंबित पेमेंट थांबविण्यात आले आहे.
श्रीलंकेतील दौऱ्यात राहुल द्रविड भारतीय संघाचा कोच ! https://t.co/OwUqGNmqhM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
एजन्सीने नियुक्त केलेले नमुने गोळा करणारे 200 जण हे राजस्थानमधील विद्यार्थी आणि डेटा एंट्री ऑपरेटर असल्याचे समजले, जे हरिद्वारला कधीच आले नव्हते. नमुने गोळा करण्यासाठी नमुने घेणाऱ्याला शारीरिकरित्या त्याठिकाणी उपस्थित राहावे लागते. एजन्सीत नोंदवले गेलेल्या नमुने गोळा करणाऱ्यांशी संपर्क साधला असता असं आढळलं, की त्यातील 50 टक्के व्यक्ती राजस्थानमधील रहिवासी आहेत. यातील बरेच जण विद्यार्थी किंवा डेटा एंट्री ऑपरेटर होते, असा अधिकाऱ्यानं सांगितलं.
इंजिनियरचा असाही सत्कार #vairalvideo #surajyadigital #सुराज्यडिजिटल #engineering #सत्कार #व्हायरल #व्हिडिओ #farmer #शेतकरी
– शेतकऱ्यांच्या शेतातील डीपी जळाली होती. नवीन डीपी बसविण्यासाठी पंधरा हजाराची लाच मागितल्या बद्दल इंजिनियरचा सत्कार केला.https://t.co/qlpCZDPapQ— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
यात नमुने घेण्यासाठी गेला असल्याची नोंद असलेल्या एकाकडे चौकशी केली असता, तो हनुमानगड (राजस्थान) येथील सरकारी अधिकृत केंद्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी असल्याचं समजलं. चौकशी केली असता त्याने सांगितले, की तो कुंभ येथे कधीच आला नव्हता. तो म्हणाला, की त्याच्या प्रशिक्षकाकडून हा डेटा देण्यात आला आहे. प्रशिक्षकानं त्याला हा आपल्या प्रशिक्षणाचा भाग असल्याचं सांगत ते अपलोड करण्यास सांगितले होते, असे तपास अहवालात म्हटले आहे.
कोरोना पुन्हा वाढला; 19 जुलैपर्यंत ब्रिटनमध्ये कडक निर्बंध https://t.co/H4lsDLpIwA
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021