सेंट पीटर्सबर्ग : युरो चॅम्पियनशीपमध्ये पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर सर्वाधिक (११) गोल करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. रोनाल्डोच्या चमकदार कामगिरीमुळे एफ गटातील मंगळवारच्या सामन्यात पोर्तुगालने शानदार खेळ केला. तसेच त्यांनी हंगेरीला ३ – ० अशा फरकाने पराभूत केले आहे. रोनाल्डोने या सामन्यात २ गोल केले. दरम्यान रोनाल्डोच्या खात्यात आतापर्यंत १०६ आंतरराष्ट्रीय गोलची नोंद झाली आहे.
https://twitter.com/RavindraRaut_/status/1404998742109868032?s=19
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील लोकप्रिय स्पर्धा असलेल्या युरो कपचा थरार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. युरो कप स्पर्धेत नवनवे रेकॉर्ड होण्यास सुरुवात झाली आहे. मातब्बर संघ आपल्या दमदार कामगिरीनं स्पर्धेत पकड निर्माण करताना दिसत आहेत. यातच एक जबरदस्त सामना ग्लास्गोमध्ये अनुभवयाला मिळाला. स्कॉटलँड आणि झेक प्रजासत्ताक यांच्यात झालेल्या सामन्यात एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला. झेक प्रजासत्ताच्या पॅट्र्रीक शिकनं केलेल्या गोलची जोरदार चर्चा रंगली आहे.
प्रजासत्ताकच्या पॅट्रीक शिकनं केवळ गोल करुन संघाला विजय प्राप्त करुन दिला नाही. तर त्यानं मैदानाच्या सेंट्रल लाइनजवळून केलेल्या गोलची युरो कप स्पर्धेच्या इतिहासात नोंद झाली आहे.
All Time leading goalscorer of Euro cup list pic.twitter.com/NEej5oPDRX
— Shaun Mohan (@shaunmohan04) June 16, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पॅट्रीक मैदानाच्या ४९.७ यार्ड म्हणजेच ४५ मीटर इतक्या दूरवरुन गोल केला. या गोलसह युरो कपच्या इतिहासात १९८० नंतर सर्वात दूरच्या अंतरावरुन गोल करणारा तो खेळाडू ठरला आहे. पॅट्रीकनं जर्मनीच्या टॉर्स्टन फ्रिन्सचा विक्रम मोडीस काढला आहे. फ्रिन्सनं २००४ साली युरो कपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध ३५ मीटर अंतरावरुन गोल केला होता.
अभिनेत्री घेत होती ड्रग्ज; पोलिसांनी भर पार्टीतून केली अटक https://t.co/eUnO7zmYyD
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
पॅट्रीकनं या सामन्यात दोन गोल करुन संघाला विजय प्राप्त करुन दिला. पण त्यानं मैदानाच्या मध्यावरुन थेट गोलपोस्टमध्ये डागलेल्या गोलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पॅट्रीकच्या केलेला गोल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि सोशल मीडियात पॅट्रीकच्या गोलची जोरदार चर्चा सुरू झालीय. पॅट्रीकनं केलेला गोल युरो कपच्या इतिहासातील न भुतो न भविष्यती असा असल्याचं काही नेटिझन्स म्हणत आहेत. तर काहींनी फुटबॉल विश्वातील आजवरचा सर्वोत्तम गोलपैकी एक गोल असल्याचं म्हटलं आहे.
कुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट, खोट्या आकड्यांमुळे खळबळ https://t.co/cazfQpHQOC
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
युरो कपमध्ये सोमवारी ड गटातील दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडसमोर झेक रिपब्लिकचं आव्हान होतं. सामन्याच्या पहिल्या हाफच्या ४२ व्या मिनिटाला पॅट्रीक शिकनं पहिला गोल करुन संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर दुसऱ्या हाफला सुरुवात झाल्याच्या सातव्याच मिनिटात पॅट्रीकनं अफलातून गोलं नोंदवून २-० अशी आघाडी घेतली. पण हा गोल केवळ २-० अशी आघाडीच देणार नव्हता, तर या गोलनं फुटबॉल चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
श्रीलंकेतील दौऱ्यात राहुल द्रविड भारतीय संघाचा कोच ! https://t.co/OwUqGNmqhM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021