मुंबई : आयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे काल बुधवारी भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.
रामभक्तांना राष्ट्रवादीचे आवाहन #surajyadigital #RamMandir #राममंदिर #सुराज्यडिजिटल #NCP #राष्ट्रवादी
– राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी रामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी – जयंत पाटीलhttps://t.co/6QWLSkKIe4— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढून निषेध करणार होते. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली नंतर याच रुपांतर हाणामारीत झाले.
मुंबई : भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, हाणामारी, पहा व्हिडिओ https://t.co/SOoNh2cC9m
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
त्यानंतर यावरून आता जोरदार राजकारण तापायला सुरवात झाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दादर, माहीम आणि वडाळा विभागातील सर्व शिवसैनिकांची, पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. शिवसेनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याचे फोटोजही ट्विट्स केले आहेत. हे फोटो ट्विट करताना शिवसैनिक आणि शिवसेना पक्ष प्रमुख इतकाच उल्लेख करण्यात आला आहे.
शिवसैनिक आणि शिवसेना पक्षप्रमुख… pic.twitter.com/zmyDgBFOU0
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 17, 2021
काल शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांना चोप दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जावी यासाठी भाजपने पोलीस स्टेशन गाठलं होतं. तर, आज या शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन त्यांच्या कौतुकाची पाठीवर थाप दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या कालच्या कृत्याचे उद्धव ठाकरेंकडून देखील समर्थन केलं गेलं असल्याच्या चर्चा होत आहेत.
मुंबई : सेनाभवन आमचं श्रद्धास्थान, त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला तर चोख उत्तर मिळणारच : महापौर किशोरी पेडणेकर #Shivsena #भवन #mayer #mumbai #भाजपा #surajyadigital #सुराज्यडिजिटल #सेनाभवन #answers #श्रद्धास्थान #shraddhasthanhttps://t.co/1lhsfLkSOu
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
तर, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी ‘आमच्या अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, शिवसेना भवनावर वाकडी नजर कराल तर असंच उत्तर देऊ,’ अशा प्रतिक्रिया देत शिवसैनिकांचं कौतुक व समर्थन केलं आहे.
स्मृतीदिन …राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा ! #surajyadigital #जिजाऊ #राजमाता #मुजरा #सुराज्यडिजिटल #स्मृतिदिन pic.twitter.com/c1h4O7LIZu
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021