मुंबई / कोची : केरळमधील कोच्ची शहराच्या पश्चिमी तटाजवळ अरबी समुद्रात एक नवं बेट दिसू लागलं आहे. हे बेट पाण्याखाली असून गुगल मॅप्स सॅटेलाईट इमेजरीच्या माध्यमातून ते दिसून आलं आलं आहे. पाण्याखाली असलेल्या बेटाचा आकार पश्चिम कोच्चीच्या तुलनेत निम्मा आहे. समुद्रात बेटाची कोणतीही दृश्यरचना न मिळाल्यानं तज्ज्ञदेखील हैराण झाले आहेत. केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीजचे (केयूएफओएस) अधिकारी याबद्दल अधिक संशोधन करत आहेत.
साबरमती नदीतील सर्व नमुने कोरोना बाधित https://t.co/eqZgB9MXE0
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
केरळमधील कोचीच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याच्याजवळ अरबी महासागरात बिनच्या आकाराचे एक बेट दिसत आहे. या बेटाचा खुलासा गुगल मॅपच्या एका सॅटेलाईट फोटोमुळे झाला. परंतु तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही पाण्याची संरचना आहे, ज्यामुळे असा आकार दिसत आहे. दरम्यान केरळ यूनिवर्सिटी ऑफ फिशरीज एंड ओशनस्टडीजचे अधिकारी याची चौकशी करण्याचा विचार करत आहेत.
केरळमधील कोचीच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याच्याजवळ अरबी महासागरात बिनच्या आकाराचे एक बेट दिसत आहे. परंतु हे बेट पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. या बेटाचा खुलासा गुगल मॅपच्या एका सॅटलाईट फोटोमुळे झाला. हा बेट आकाराने इतका मोठा आहे की, तो पश्चिम कोचीच्या क्षेत्रफळाच्या अर्धा आहे. परंतु तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही पाण्याची संरचना आहे, ज्यामुळे असा आकार दिसत आहे. केरळ यूनिवर्सिटी ऑफ फिशरीज एंड ओशनस्टडीजचे अधिकारी याची चौकशी करण्याचा विचार करत आहेत.
WTC फायनल ब्रेकिंग- पहिलं सत्र रद्द, बीसीसीआयची मोठी घोषणा #BCCI #WTCFinal #WTC21 #surajyadigital #cricket #सुराज्यडिजिटल #Declaration pic.twitter.com/qpYj2IqF0V
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
कोच्ची शहरापासून 7 किलोमीटर दूर असलेल्या बेटाची निर्मिती कशी झाली यावर प्रकाश टाकण्याचं काम सुरू असल्याची माहिती केयूएफओएसचे कुलगुरू रिजी जॉन यांनी दिली. ‘गुगल मॅप्समध्ये पाहिल्यावर कोच्ची जवळ समुद्राखाली पाण्यात एक बेट दिसून येतं. हे बेट कशापासून तयार झालं आहे याची माहिती अद्याप उपलब्ध नाही. वाळू किंवा मातीपासून हे बेट तयार झालं असावं अशी शक्यता आहे. याबद्दल संशोधन होणं गरजेचं आहे,’ असं जॉन यांनी सांगितलं.
एक विवाह असा ही! मनमाडमध्ये किन्नरसोबत विवाह; तरुणाचा आदर्श सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख https://t.co/f1w7XHlrbJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘द न्यूज मिनिट’च्या वृत्तानुसार, चेल्लनम कारशिका टूरिझम डेव्हलपमेंट सोसायटी नावाच्या संस्थेने पत्र लिहल्यानंतर, हे प्रकरण KUFOS च्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या महिन्याच्या सुरुवातीला एका फेसबुक पोस्टमध्ये संघटनेचे अध्यक्ष अॅकेएक्स जुलप्पन यांनी मॅपच्या फोटोच्या माध्यमातून असा दावा केला की, या बेटाची लांबी 8 किमी आणि रुंदी 3.5 किमी आहे.
शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ #shalu #शालू #surajyadigital #shortdress #सुराज्यडिजिटल #डॉन्स #dance pic.twitter.com/TZECjTxHsI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
KUFOS चे कुलगुरू के. रिजी जॉन यांनी सांगितले की, ही घटना कशी घडली याची शक्यता संघटनांकडून पहिली जात आहे. ते म्हणाले की, “जेव्हा Google मॅपवरून तर पाण्याखालील ते इतर बेटांसारखे दिसते आणि त्याला एक विशिष्ट आकार देखील आहे. परंतु हा बेट कशापासून बनलेला आहे हे आम्हाला माहित नाही. हा बेट वाळू किंवा चिकणमातीचा बनलेला असू शकतो. परंतु खरे काय आहे? हे तर तपासणीमध्येच कळू शकते. सध्या आम्ही याबद्दल काही सांगू शकत नाही.”
रिजी जॉन म्हणाले की, कोचीन बंदरातील खोदकामामुळे अशी संरचना झाली असावी. आम्हाला या संभाव्यतेची चौकशी करावी लागेल. पाण्याचा प्रवाह किंवा लाटा यांसारख्या घटकांमुळे हे घडू शकते. तसेच जॉन म्हणाले की, ‘केरळमध्येच दक्षिणेकडील भागावर ऊन्हाची समस्या आहे, ज्यामुळे हे घडले असावे.
ट्विटरनंतर आता इन्स्टाग्रामवर एफआयआर दाखल https://t.co/1R20RV7BjX
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
KUFOS च्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते इतर तज्ज्ञांची बैठक घेतली जाईल आणि या बेटाच्या शक्यतेवर चर्चा केली जाईल. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून ही निर्मिती पाहिली जात असल्याचा दावा चेल्लानम कारशिका टूरिझम डेव्हलपमेंट सोसायटीच्या प्रतिनिधींनी केला आहे. तथापि, त्याचा आकार वाढलेला नाही. ते म्हणाले की, या रहस्यमय बेटाबद्दल अनेक प्रश्न आहेत, ज्यांचे उत्तर केवळ तपासातूनच मिळू शकेल.
कोरोना लशीमध्ये गायीच्या वासराचं सीरम?; मोदी सरकारनं दिलं स्पष्टीकरण https://t.co/4T8EFDDeMT
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021