अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये साबरमती नदीमध्ये कोरोना विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे. गांधीनगर येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या टीमने ३ सप्टेंबरपासून २९ डिसेंबर २०२० पर्यंत दर आठवड्याला नदींचे नमुने घेतले होते. या सर्व नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू सापडला आहे. त्यामुळे कोरोना विषाणू हा नदीच्या स्वच्छ पाण्यामध्ये जिवंत राहू शकतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
https://twitter.com/JournlistSakshi/status/1405785063153979393?s=19
देशातील अनेक शहरांमधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये कोरोना विषाणू सापडल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता नैसर्गिक पाण्याच्या स्रोतामध्येही कोरोना विषाणू सापडला आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये साबरमती नदीमध्ये कोरोना विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नदीतील विविध ठिकाणांहून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू सापडल्याने शास्त्रज्ञांनाही धक्का बसला आहे.
जपानमध्ये बौद्ध देवीच्या 57 मीटर उंच पुतळ्यावर लावला 35 किलोचा मास्क #mask #budha #japan #मास्क #surajyadigital #सुराज्यडिजिटल #बुद्ध #बौद्ध #देवी pic.twitter.com/U4MnfVFA9X
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती नदीसह कांगरिया, चांदोला तलाव येथील पाण्याच्या नमुन्यांमध्येही कोरोना विषाणू सापडला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर तज्ज्ञांनी आसाममधील गुवाहाटी येथीस नद्यांमधील पाण्यांच्या नमुन्यांचीही तपासणी केली. त्यामध्ये आसाममधील भारू नदीमधून घेण्यात आलेल्या नमुन्यामध्ये कोरोना विषाणू सापडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ट्विटरवर अनेकांचे युजर्सचे फॉलोवर्स अचानक कमी होतात, कारण… https://t.co/XQEkOE9jkK
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
दरम्यान, नद्यांमधून जे नमुने घेण्यात आले त्यामध्ये विषाणू आढळून आले आहेत. नद्यांच्या पाण्यामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत आयआयटी गांधीनगरसह देशातील आठ संस्थांनी शोध घेतला. त्यामध्ये नवी दिल्ली स्थित जेएनयूच्या स्कूल ऑफ इन्व्हायरमेंट सायन्सच्या संशोधकांचाही समावेश होता. गांधीनगर येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे मनीष कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत केवळ सीवेज लाईनमध्येच कोरोना विषाणू जीवित दिसून आला होता.
कोरोना लशीमध्ये गायीच्या वासराचं सीरम?; मोदी सरकारनं दिलं स्पष्टीकरण https://t.co/4T8EFDDeMT
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
मात्र आमच्या टीमने जेव्हा नदीच्या पाण्याचे सँपल घेतले आणि त्याची तपासणी केली तेव्हा आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली आहे. अहमदाबादमध्ये सर्वाधिक वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लँट आहे आणि गुवाहाटीमध्ये एकही नाही. आमच्या टीमने या दोन्ही ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली आणि दोन्हीकडे नमुने हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.
ट्विटरनंतर आता इन्स्टाग्रामवर एफआयआर दाखल https://t.co/1R20RV7BjX
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
गांधीनगर येथील इंडियन इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे मनीष कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या टीमने ३ सप्टेंबरपासून २९ डिसेंबर २०२० पर्यंत दर आठवड्याला नदींचे नमुने घेतले होते. साबरमतीमधून ६९४, कांकरिया येथून ५४९ आणि चंदोला येथून ४०२ नमुने घेण्यात आले. या सर्व नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू सापडला आहे. त्यामुळे कोरोना विषाणू हा नदीच्या स्वच्छ पाण्यामध्येही जिवंत राहू शकतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ #shalu #शालू #surajyadigital #shortdress #सुराज्यडिजिटल #डॉन्स #dance pic.twitter.com/TZECjTxHsI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021