मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताच्या शेफाली वर्माने इंग्लंडला चांगलंच हैराण करुन सोडलं. 17 वर्षाच्या शेफालीने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
सामन्यात तिने सुनील गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी केली. शेफालीने कसोटी पदार्पणात दोन्ही डावात (96), (63) अर्धशतक ठोकलंय. गावस्करांनी 6 मार्च 1971 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पणात (65) आणि (67) अर्धशतक ठोकलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच पहिल्या डावात तिने 96 धावा ठोकून इंग्लंडच्या संघाला पुरतं हैरान केलं तर दुसऱ्या डावातही तिने अर्धशतक ठोकून आपल्यातली क्षमता आणि प्रतिभा दाखवली. शेफाली वर्मा हिने भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी केली आहे.
शेफाली वर्मा हिने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरुद्ध दमदार प्रदर्शन केलंय. याचबरोबर तिनं आपल्या नावावर खास रेकॉर्ड देखील केला आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गावस्कर यानंतर शेफाली पहिली अशी बॅट्समन ठरली आहे जिने कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच दोन्ही डावात अर्धशतक ठोकलंय.
https://twitter.com/immaculate_sam/status/1406301598796509185?s=19