सोलापूर : यंदाही पंढरपूरची पायी वारी रद्द करण्यात आली. मानाच्या दहा पालख्या बसने नेण्यात येणार आहेत. त्यातच आता आषाढी वारीला यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण 17 ते 25 जुलै या काळात म्हणजे आषाढी वारीसाठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पाठवला आहे. तसेच चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू करण्यात येईल. शिवाय सोलापूरमध्ये या काळात त्रिस्तरीय नाकाबंदी लावण्यात येणार आहे.
शिवसेनेत दोन गट, एक राष्ट्रवादीसोबत दुसरा भाजपसोबत; मोठा गौप्यस्फोट https://t.co/RMkfX8MMUM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
गेल्या वर्षीपेक्षा यंदा राज्यात आणि विशेषतः सोलापूर जिह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने आषाढी यात्रेला 17 ते 25 जुलै या काळात पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावांत संचारबंदीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
येणार तर मोदीच – फडणवीस #surajyadigital #DevendraFadnavis
– कितीही पक्ष एकत्रं या मात्र 2024 मध्ये येणार तर मोदीच – देवेंद्र फडणवीस
यावर तुमची प्रतिक्रिया काय ? #सुराज्यडिजिटल #देवेंद्र #फडणवीस #political #Modi #2024Electionhttps://t.co/51AQ9oWF0P— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
यंदा सर्व मानाच्या 10 पालख्या बसमधून दशमीदिवशी पंढरपूरमध्ये येणार असून, पौर्णिमेला परत जाणार असल्याने सात दिवस संचारबंदीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
या काळात सोलापूर जिल्हा सीमा, पंढरपूर तालुका सीमा आणि पंढरपूर शहर सीमा अशा तीन ठिकाणी तिहेरी नाकाबंदी करण्यात येणार असून, परवानगी दिलेल्या भाविकांशिवाय कोणालाही आषाढीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. काही भाविक जर पंढरपूरकडे आले, तर त्यांची समजूत घालून त्यांना परत पाठविले जाणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले. आषाढी यात्राकाळात चंद्रभागास्नानासाठी भाविकांनी येऊ नये म्हणून चंद्रभागा परिसरात 144 कलम जारी केले जाणार आहे.
रासपचे विजयकुमार हत्तुरेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश https://t.co/pu3bfBJ2Lj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 22, 2021
ज्या भाविकांना शासनाने परवानगी दिली आहे, अशा भाविकांना पासेस देऊन त्यांनाच नगरप्रदक्षिणा आणि विठ्ठल मंदिरात सोडण्यात येणार आहे. याशिवाय पंढरपूर शहरातील नागरिकांनाही बाहेर पडता येणार नसल्याचे सातपुते यांनी सांगितले. सध्या सोलापूर जिह्यात कोरोनाचे संकट कायम असल्याने ही खबरदारी घेतली जात आहे, असे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
'चिल्लर जमा करुन रुपया होत नाही', मोडीत निघालेल्या पक्षांना पवार एकत्र करतायत, बत्ती बुझने से पहले थोडी जलनी चाहीएhttps://t.co/EgYjc8Qiyj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 22, 2021