मुंबई : शाहरुख खान आणि अक्षय कुमार हे दोघंही बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जातात. पण या दोघांना एकत्रित काम करताना पाहिले नसेल. यामागचे कारण शाहरुखने सांगितले आहे. अक्षय खूपच शिस्तप्रिय आहे. तो खूप लवकर उठतो आणि मी उशीरा उठतो. आमच्या जगण्याच्या वेळा परस्पर विरुद्ध आहेत. त्यामुळे आम्ही कधी एकत्र काम करु असं वाटत नाही, असं शाहरुखने म्हटलं आहे.
शिवसेनेत दोन गट, एक राष्ट्रवादीसोबत दुसरा भाजपसोबत; मोठा गौप्यस्फोट https://t.co/RMkfX8MMUM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
हे दोघंही बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जातात. एकाला रोमान्स किंग म्हटलं जातं तर दुसऱ्याला बॉलिवूडचा ॲक्शनस्टार. दोघंही आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. या पार्श्वभूमीवर या दोन सुपरस्टार्सला एकाच चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. परंतु त्यांची ही इच्छा कधीही पुर्ण होणार नाही असे संकेत खुद्द शाहरुख खाननं दिले. त्यानं अक्षय कुमारसोबत काम न करण्याचं कारण सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
धुळ्यासह 5 जिल्ह्यात 19 जुलैला पोटनिवडणूक
https://t.co/PJ2yMaEPeX— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
एका दिलेल्या मुलाखतीत शाहरुखनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्याने अक्षय कुमारसोबत काम न करण्याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, “अक्षय खूपच शिस्तप्रिय अभिनेता आहे. तो खूप लवकर उठतो आणि मी उशीरा उठतो. माझा दिवस जेव्हा सुरु होतो तेव्हा अक्षय झोपण्याची तयारी करत असतो. आमच्या जगण्याच्या वेळा परस्पर विरुद्ध आहेत. त्यामुळं आमची भेट कधीही होत नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही कधी एकत्र काम करु असं वाटत नाही.”
आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदीचा प्रस्ताव https://t.co/3VxaaY0Kz9
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
अक्षय आणि शाहरुखनं ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात अक्षयनं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. 1997 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट जबरदस्त गाणी आणि स्टार कास्टमुळं तुफान गाजला होता. मात्र यानंतर पुन्हा कधीही अक्षय आणि शाहरुख यांनी एकत्र काम केलं नाही. अन् यापुढे देखील ते एकत्र काम करु शकतील असं शाहरुखला वाटत नाही.
रासपचे विजयकुमार हत्तुरेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश https://t.co/pu3bfBJ2Lj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 22, 2021