मुंबई : सध्या बाजारात अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर आणत आहेत. त्यात आता दुचाकी निर्माती करणारी प्रसिद्ध होंडा कंपनी देखील इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे. Benly-E असे या स्कूटरचे नाव असून सध्या ट्रायल सुरु आहे. टेस्टिंग मॉडेलमध्ये कंपनीनं LED हेडलॅम्प डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि अॅक्सेसरीज पॉवर सॉकेट दिलं आहे.
भंगारवाल्याने विकत घेतली 6 हेलिकॉप्टर, जगभरात चर्चा https://t.co/1vHpEjEuTI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकांचा कल आता इलेक्ट्रीक वाहनांकडे वाढू लागला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. ग्राहकांची वाढती आवड पाहता वाहन उत्पादक कंपन्याया सेगमेंटमध्ये नवी मॉडेल्स आणण्याच्या तयारीत आहेत. नुकतीच दिग्गज वाहन उत्पादक कंपनी होंडाची इलेक्ट्रीक स्कूटर Benly-E ची चाचणी सुरू असल्याचं दिसून आलं होतं.
WTC फायनल : क्रिकेटच्या मैदानातील सर्वात सुंदर फोटो https://t.co/TXO9gKo9j0
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
गेल्या वर्षी २०१९ मध्ये होंडानं आपली Benly-E या इलेक्ट्रीक स्कूटरच्या सीरिजला पहिल्यांदा बाजारात सादर केलं होतं. या सीरिजमध्ये एकूण चार मॉडेल्स आहेत. आता या स्कूटरचं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारा टेस्टिंग सुरू असल्याचं दिसून आलं आहे. या सीरिजच्या सर्व स्कूटर्समध्ये निरनिराळे फीचर्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. टेस्टिंग दरम्यान ही स्कूटर दिसल्यानं आता याच्या लाँचच्या बाबतीतही चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु सध्या कंपनीद्वारे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अनोखी पुरुषांची वटपौर्णिमा
– पत्नी पिडितपुरुष आश्रम येथे पिंपळ पौर्णिमा साजरी केली,…अशा बायकाबरोबर सातजन्म काय सात सेकंद देखील संसार करू शकत नाही #surajyadigital #संसार #वटपौर्णिमा #vatpoornima #world #victims #सातजन्म #sevenbirthshttps://t.co/jlRiLLyqUR— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
कंपनी आपली ही इलेक्ट्रीक स्कूटर दोन निरनिराळ्या पर्यायांसोबत सादर करत आहेत. याच्या Benly e I आणि Pro I मध्ये २.८kW क्षमतेच्या मोटरचा वापर करण्यात आला आहे, जी १३एनएमचा टॉर्क जनरेट करते. ३० किलोमीटर प्रति तास या वेगानं स्कूटर चालवल्यास एका चार्जमध्ये ती ८७ किलोमीटरपर्यंत जाऊ शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे Benly e II आणि Pro II मध्ये ४.२kW क्षमतेच्या इलेक्ट्रीक मोटरचा वापर करण्यात आला आहे. ६० किलोमीटर प्रति तास वेगानं स्कूटर चालवल्यास ती ४३ किलोमीटरची रेंज देऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. तसंच यामध्ये ४८V क्षमतेच्या दोन रिमुव्हेबल बॅटरीचा वापर करण्यात आला आहे.
जीभ आहे की काय; तरुणाच्या लांब जीभेचा रेकॉर्ड, आगामी काय आहे लक्ष्य ?https://t.co/k0beXUiau2
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
टेस्टिंग मॉडेलमध्ये कंपनीनं LED हेडलँप डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि ॲक्सेसरीज पॉवर सॉकेट दिलं आहे. या स्कूटरच्या पुढील बाजूला मोठं बास्केट आणि मागील बाजूला कॅरिअरही देण्यात आलं आहे. यावर सर्वाधिक ६० किलोपर्यंतचं वजन ठेवता येऊ शकतं. सध्या ही स्कूटर केवळ सिंगल कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे आणि यात रिव्हर्स असिस्ट फंक्शनसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.
अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, भाजपच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर, अनिल देशमुखांनंतर अजित पवारकडे मोर्चा https://t.co/WnsPpoSmD7
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
Benly E इलेक्ट्रीक स्कूटरच्या पुढील बाजूला १२ इंचाचा आणि मागील बाजूला १० इंचाचं टायर देण्यात आलं आहे. या स्कूटरचं एकूण वजन १२५ ते १३० किलोग्रामच्या दरम्यान आहे. यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. या स्कूटरचा खासगी तसंच व्यावसायिक पद्धतीनंही वापर करता येऊ शकतो.
आजचा दै. सुराज्य
http://epaper.surajyadigital.com/epaper.php &
visit us : www.surajyadigital.com