मुंबई : आतापर्यंत भंगार वाल्याने सायकल, दुचाकी किंवा कार घेतल्याचं ऐकलं असेल पण हेलिकॉप्टर घेतल्याचं कधी ऐकलं आहे का? असाच एक अजब प्रकार समोर आला आहे.
पंजाबमधून एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. येथील भंगाराचं सामान विकणाऱ्या एका व्यक्तीनी भारतीय सैन्याचे 6 कंडम हेलिकॉप्टर खरेदी केली आहे. जे पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. या एका हेलिकॉप्टरचं वजन 10 टन इतकं आहे. लिलावाच्या माध्यमातून भंडार विक्रेत्याने हे हेलिकॉप्टर खरेदी केले आहेत.
भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, केली महत्त्वाची मागणी https://t.co/Qfu0Zm1r9T
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
एक हेलिकॉप्टर मुंबईतील व्यक्तीने घेतलं आहे, तर लुधियानातील हॉटेल मालकाने दोन हेलिकॉप्टर खरेदी केली आहे. उरलेले हेलिकॉप्टर मानसा येथे उभे आहेत. सध्या हे हेलिकॉप्टर लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. पंजाबमध्ये भंगाराचं सामनासाठी मिट्ठू भय्याचं नाव प्रसिद्ध आहे. भंगारवाल्याने 3 हेलिकॉप्टर खरेदी केले. हे ऐकून एक क्षण विश्वास बसणार नाही मात्र हे घडलंय. हा संपूर्ण प्रकार पाहण्यासाठी लोकांनी गर्दीही केली.
मुंबई – पुणेकरांसाठी सुखद बातमी
* मुंबई – पुणे – मुंबई मार्गावर चालणारी अशी नवीन रेल्वे…#मुंबई #pune #surajyadigital #पुणे #mumbai #realway #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/OsrqkwuVGl— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
मिट्ठू राम अरोराने सांगितलं की, लिलावानंतर ट्रॉलिंच्या माध्यमातून हे हेलिकॉप्टर मानसा येथे आणले. मिट्ठू रामने सांगितलं की, त्यांनी पहिल्यांदाच हेलिकॉप्टरची खरेदी केली. आता ते बघण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
जेईई परीक्षा 17 जुलैला होणार तर 14 ऑगस्टपर्यंत निकाल येणार https://t.co/QOkkhK2pFC
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
मानसा इथे एका भंगारवाल्याने भारतीय सेन्यदलाचे हेलिकॉप्टर खरेदी केले. हे हेलिकॉप्टर रस्त्यावरून घेऊन जात असताना ते पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली होती. भंगारवाल्याच्या दुकानाबाहेर देखील मोठ्या रांगा लागल्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिळालेल्या माहितीनुसार एका हेलिकॉप्टरचं वजन साधारण 10 प्रति टन असणार आहे. भंगारातील हे 6 कंडम हेलिकॉप्टर मुंबईच्या एका व्यक्तीनं खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे. तर 2 हेलिकॉप्टर्स लुधियानाच्या एका हॉटेल मालकानं खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे. तर 3 हेलिकॉप्टर मानसा इथल्या भंगारवाल्यानं खरेदी केले आहेत.
कोरोना संकटात ऑलिम्पिक, दारू मिळणार नाही, अनेक भागात मादक पेयांवर बंदी #surajyadigital #बंदी #सुराज्यडिजिटल #कोरोना #olympics2021 #अॉलिम्पिक #wine pic.twitter.com/rXYA6JmKcJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
पंजाबच्या मिट्ठू कबाडिया नावाच्या भंगारवाल्याकडे हे हेलिकॉप्टर्स पोहोचल्याची माहिती मिळताच लोकांनी पाहण्याची मोठी गर्दी केली. लोकांनी या हेलिकॉप्टर्सचे फोटो देखील काढले आहेत. हा सर्व प्रकार पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. मिट्ठू कबाडिया नावाच्या या भंगारवाल्याने हे हेलिकॉप्टर विकत घेतल्यानं त्याची जगभरात चर्चा आहे.
भारतीय वायू सैन्याकडून भंगारात हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर मानसा येथील भंगार विक्रेता तीन हेलिकॉप्टर घेऊन मानसा येथे पोहोचला. आता तर ते हेलिकॉप्टर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. अख्खं शहर हेलिकॉप्टरच्या आत, वर, बाहेर उभं राहून फोटो काढत आहे.
शहरात एकीकडे हेलिकॉप्टर मनोरंजनाचं साधन झालं आहे तर दुसरीकडे भंगार विकणाऱ्या कुटुंबासाठी हा व्यवहार फायद्याचा ठरला आहे. कारण यामुळे हॉटेल आणि पर्यटन ठिकाणी हे हेलिकॉप्टर उभे केल्यामुळे पर्यटकांसाठी हे आकर्षणाचं क्रेंद ठरू शकतं.
…म्हणून शाहरुख आणि अक्षय कुमार एकत्र काम करत नाहीत https://t.co/UTHGMe0IU4
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021