मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने रत्नागिरी जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली. मृत व्यक्ती 80 वर्षांची महिला असून ती संगमेश्वरमधील रहिवासी होती. तसेच राज्यात सध्या डेल्टा व्हेरिएंटचे 21 रुग्ण आहेत. दरम्यान देशातील 6 राज्यात कोरोनाचा हा प्रकार आढळला आहे. याआधी मध्य प्रदेशात यामुळे एकाचा मृत्यू झाला होता. केंद्राने यासंदर्भात अलर्ट केले आहे.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचं वाढतं प्रमाण आणि काही जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारन निर्बंध शिथिल करण्याच्या नियमात बदल केले आहेत.याबाबतच्या नियमावलीनुसार सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
— आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) June 25, 2021
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहा:कार माजवला होता. ऑक्सिजन बेड आणि इतर अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे या काळात अनेकांना आपले प्राण गमावले लागले. सध्या देशातील परिस्थिती सर्वसाधारण होण्याच्या मार्गावर असताना आता देशावर डेल्टा प्लस व्हेरियंटचे संकट घोंघावत आहे. त्यातच महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटचा पहिला बळी गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आणीबाणीला 46 वर्ष पूर्ण, नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी केले ट्वीट, भाजपमध्ये ट्वीटवर ट्वीट, 'तो' दिवस ठरला होता देशासाठी 'काळा दिवस'
https://t.co/Ax4jVtYr4j— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरची रहिवासी असलेल्या एका 80 वर्षांच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. या वृद्ध महिलेला डेल्टा प्लस विषाणूची लागण झाली होती. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत महिलेला इतरही आजार होते, अस राजेश टोपे यांनी सांगितलं.
अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, याआधीही झाली होती अटक https://t.co/hkl2gCMrlC
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021
राज्यातील सात जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळल्याने काहीसे भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या सर्व रुग्णांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. सर्वांना लगेचच विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. यातील काही रुग्ण बरे झालेले असून डेल्टा प्लसची लागण अद्याप एकाही लहान मुलास झालेली नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
मुंबई, नागपुरात ईडीचे छापे; अनिल देशमुख गेले कुठे? https://t.co/S5ACY7z0Fn
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, आत्तापर्यंत 3 हजार 400 नमुन्यांपैकी 21 केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यात करोनाच्या डेल्टा प्लस प्रकारातील 21 रुग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण 0.005 टक्के आहे. त्यामुळे करोनाचा डेल्टा प्लस प्रकाराची गंभीर वाढ झाली नाही. मात्र हा काळजी करण्यासारखा विषय नसला तरी त्याचे गुणधर्म गंभीर असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
मुंबई मेट्रोमध्ये भरती, मिळणार घसघशीत पगार https://t.co/1vDclXWtEa
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021