अमरावती : शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. तिवस्यातील आशिर्वाद बारसमोर रात्री 10.30 वाजता 5 जणांनी पाटील यांची हत्या केली. अमोल पाटील मित्रासोबत बारमध्ये आले होते. यावेळी 5 जणांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून पाटील यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. रात्री उशिरा पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली तर 1 जण फरार आहे. अवैध धंद्यातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे.
मिताली राजचा विक्रम ! सचिननंतर 'अशी' कामगिरी करणारी पहिली क्रिकेटर https://t.co/vN0TbbFC74
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
अमोल पाटील याच्यावर यापूर्वी दोन हत्या केल्याचा आरोप होता. त्याला दीड महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपार होण्याचा आदेशही काढला होता. अवैध उद्योगातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे.
अमोल पाटील मित्रासोबत शनिवारी रात्री आशीर्वाद बारमध्ये गेला होता. मात्र बार बंद झाल्याने दोघंही बारसमोर बसले होते. यावेळी दोन ते तीन जणांनी अमोल पाटीलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले.
विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे, जमा होणारी रक्कम अत्यल्प https://t.co/EYxaNCSIYA
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताच्या विजयाचे शिल्पकार सॅम माणेकशॉ यांना विनम्र अभिवादन ! #शिल्पकार #surajyadigital #सुराज्यडिजिटल #india #विजय #सॅममाणेकशॉ #sammamish pic.twitter.com/mFPDpcB8L3
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमा झाली होती, मात्र अद्यापही आरोपींचा शोध लागला नाही. राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कंगना राणावतचे फोटो पाहून चाहते बुचकळ्यात; ही रंग का फासते ? https://t.co/Cc6RBb2yPN
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
याआधी, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि शिवसेना संस्थापक उमेशभाई शेट्टी यांचे पुत्र राहुल उमेश शेट्टी यांची पुण्यात निर्घृण हत्या झाली होती. राहत्या घरासमोर जयचंद चौकातच डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रांनी वार करत त्यांना जवळून तीन गोळ्या मारण्यात आल्या होत्या.
सोलापूर : लॉकडाऊनमध्ये काळजी घेतली मात्र अनलॉकमध्ये बेजबाबदार का ? पहा सोलापूरची बालकलाकार ओवी तडवळकर काय सांगतीय, ऐका थोडं… #ovi #ओवी #लॉकडाऊन #surajyadigital #lockdown #Unlock #solapur #सोलापूर #care #listen #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/WcAL7qtszq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021