सोलापूर : एकीकडे राज्यावर डेल्टा प्लसचे संकट घोंगावत असताना सोलापूर जिल्ह्यातील पालकांची आपल्या मुलांच्या प्रति चिंता वाढली आहे. कारण जिल्ह्यात जवळपास २० बालकांना कोरोनाची बाधा झाल्याची तर १५ हजार बालकांना कोरोना सदृश्य लक्षणे असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या तपासणीत समोर आली आहे.
सोलापूर : माकपाच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. शेतीवाचवा, लोकशाही वाचवा, देशवाचवा अशा घोषणा देण्यात आल्या. पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी घोषणाबाजीनंतर ताब्यात घेतलं. #surajyadigital #माकप #आंदोलन #सुराज्यडिजिटलhttps://t.co/P4j5zrJKEj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सुमारे नऊ लाख बालकांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. ‘मुलं माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत साधारण सव्वा लाख बालकांची तपासणी झाली असून त्यापैकी २० बालकांची चाचणी करोना पॉझिटिव्ह आली आहे. तर पंधरा हजार मुलांमध्ये करोना सदृष्य आजाराची लक्षणे असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.
जानकर परिवाराच्या विवाह सोहळ्यास शरद पवार यांची हजेरी, जानकरांच्या दुसर्या पिढीला शरद पवारांचा आशीर्वाद https://t.co/8sDergMPxX
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
ग्रामीण भागातील 9 लाख 77 हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. तपासणी मोहिमेच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 20 मुले कोरोना पॉझीटिव्ह सापडली असून त्यांच्यावर डॉक्टराच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत, शिवाय विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर दैनंदिन लक्ष ठेवण्यात येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अभिमानास्पद ! 3 कोटी लोकांना लस देणारा पहिला राज्य ठरला महाराष्ट्र, 12 ते 18 वयोगटातील मुलांसांठी कोरोना लस लवकरच उपलब्ध होणारhttps://t.co/5iRCEBHpRH
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
दुर्दैवाने लागण झाल्यास त्या संदर्भात नियोजन चालू आहे. कोव्हिड सेंटर्स तसेच सर्व हॉस्पिटलमध्ये 20 टक्के बालकांसाठी बेड राखून ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बालकांना त्रास होऊ लागल्यास तेथे स्थलांतर करून उपचार सुरू करता येतील. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे.
सध्या राज्यात कोव्हिड-१९ च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश करण्यात आले आहेत.आपत्ती व्यवस्थापन २००५ च्या कायद्याअंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत कोव्हिड-१९ची साखळी तोडण्यासाठी वेळोवेळी विविध आदेशांद्वारे राज्यात निर्बंध लागू केले आहेत.
खायला मटण मिळालं नाही म्हणून नवरदेव भडकला, लग्नातूनच गुपचूप पसार, गावातच मुक्काम करुन दुसरी सोबत लग्न https://t.co/4DxgNAXPby
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
महाराष्ट्र राज्यात कोव्हिड-१९चा धोका कायम असल्याने तसेच डेल्टा, डेल्टा प्लस या कोव्हिडच्या नव्या व्हेरिएंट्सचा प्रसार होत असून लवकरच (४ ते ६आठवडे) कोव्हिडची तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं बालकांबाबत सोलापूर जिल्ह्यात सदरची आकडेवारी समोर येताच सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही सोलापूर जिल्ह्यातील पालकांना आपल्या पाल्याची काळजी घेण्याची आवाहन केले आहे.
पुण्यात सोमवारपासून नवे निर्बंध; काय सुरु काय बंद ?, पुणे शहरात एकूण रुग्णसंख्या पावणे पाच लाखांच्या वरhttps://t.co/IsmlHONmXU
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
* १२ ते १८ वयोगटातील मुलांसांठी कोरोना लस लवकरच उपलब्ध होणार
१२ ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांना लवकरच कोरोना लस मिळणार आहे. कारण, या वयोगटातील मुलांसाठीच्या झायडस कॅडिलाच्या लसीला मंजुरी देण्यात येणार असल्याचे मोदी सरकारने प्रतिज्ञापत्रात सांगितले. या लसीची १२ ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांवरील वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे. तसेच, भारत बायोटेकच्या लसीची २ ते १८ वर्षांवरील मुलांवर वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आली आहे.
सोलापूर : मार्केट यार्ड चौकात ओबीसी आरक्षण रद्द निषेधार्थ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा चक्काजाम, पोलिसांनी घेतले ताब्यात #surajyadigital #सुराज्यडिजिटल #OBCReservation #भाजपा #solapur #सोलापूर pic.twitter.com/bfJLmzbA1g
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021