मुंबई : उन्हाळ्यातील सुट्टीच्या काळातील पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यात केवळ उन्हाळी सुट्टी कालावधीतील रक्कम जमा करावयाची आहे. दोन महिन्यांतील अंदाजित कार्य दिवस ३५ गृहीत धरल्यास इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात एकूण १५६ रुपये ८० पैसे आणि इयत्ता सहा ते आठसाठी ३२४ रुपये ८५ पैसे जमा होतील.
पुण्यात सोमवारपासून नवे निर्बंध; काय सुरु काय बंद ?, पुणे शहरात एकूण रुग्णसंख्या पावणे पाच लाखांच्या वरhttps://t.co/IsmlHONmXU
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ (NFSA) अंतर्गत देशातील सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांना दरमहा ५ किलो प्रति लाभार्थी अन्नधान्याचे वेगवेगळ्या योजनांद्वारे वितरण करण्याचे जाहीर केले आहे. केंद्र शासनाच्या मोफत धान्य देण्याच्या तरतुदीचा एक भाग म्हणून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सन २०२१ च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक वेळ विशेष कल्याणकारी उपाय म्हणून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या आहार खर्चाच्या रकमेइतके आर्थिक साहाय्य थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण करण्याचे नियोजन केलेले आहे.
जानकर परिवाराच्या विवाह सोहळ्यास शरद पवार यांची हजेरी, जानकरांच्या दुसर्या पिढीला शरद पवारांचा आशीर्वाद https://t.co/8sDergMPxX
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
उन्हाळ्यातील सुटीच्या काळातील पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे बँकेत खाते नाही; तर असलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यात व्यवहार नसल्याने त्यांना दंड आकारण्यात येण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यामुळे ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची शासनाची योजना रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंमलबजावणी कार्यान्वयातील शाळास्तरावरील अडचणी समजून घेऊन आवश्यक बदल करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यात १५ हजार बालकांना कोरोना सदृश्य लक्षण, मुलांसांठी कोरोना लस लवकरच होणार उपलब्ध https://t.co/g3CKaLliuJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
दरम्यान दिनांक ९ जुलै, २०२१ पर्यंत बँक खात्याची सर्व माहिती अद्ययावत करुन जिल्हास्तरावर जतन करण्यात यावी जेणेकरुन शासनस्तरावरुन पुढील निर्देश प्राप्त होताच उचित कार्यवाही करण्याकरीता सदर माहिती उपलब्ध करुन देणे शक्य होईल. बॅक खाते उघडण्याकरीता शाळेने संबंधित पालकांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन सर्व शाळांना निर्गमित करण्यात यावेत असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
अभिमानास्पद ! 3 कोटी लोकांना लस देणारा पहिला राज्य ठरला महाराष्ट्र, 12 ते 18 वयोगटातील मुलांसांठी कोरोना लस लवकरच उपलब्ध होणारhttps://t.co/5iRCEBHpRH
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
विद्यार्थ्यांच्या खात्यात केवळ उन्हाळी सुट्टी कालावधीतील रक्कम जमा करावयाची आहे. दोन महिन्यांतील अंदाजित कार्य दिवस ३५ गृहीत धरल्यास इयत्ता पहिली ते पाचवीसाठी दर दिवशी ४.४८ रुपये दराने एकूण फक्त १५६ रुपये ८० पैसे आणि इयत्ता सहा ते आठसाठी दर दिवशी ६.७१ रुपये दराने एकूण फक्त २३४ रुपये ८५ पैसे जमा होतील. ही जमा होणारी रक्कम अत्यल्प आहे.
खायला मटण मिळालं नाही म्हणून नवरदेव भडकला, लग्नातूनच गुपचूप पसार, गावातच मुक्काम करुन दुसरी सोबत लग्न https://t.co/4DxgNAXPby
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021