सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर दौऱ्यावर येणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशनेत्याचा दौरा पूरग्रस्त परिस्थितीमुळे अचानक रद्द झाला आहे. स्थानिक काँग्रेसच्या बंडखोर नेतेमंडळी मध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. या दौऱ्यामध्ये प्रदेश पातळीवर नेत्यांसमोर शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्क्षाच्या विरोधात बंडाचे निशान फडकवत त्यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचणार होते. मात्र हा दौरा रद्द झाल्याने हे बंडखोर काँग्रेसचे नेते मंडळी नाराज झाली असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्ष बांधणीवर जोर देत आहेत. शिवसेना शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जनतेची संवाद साधत आहे. तर काँग्रेसने देखील स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा नारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे दिला आहे. त्यानुषंगाने प्रदेश पातळीवर नेतेमंडळींचे राज्यभर दौरा चालू आहेत. प्रदेश पातळीवर तीन जणांचे पथक पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. हे पथक सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येणार होते
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर ,पुणे पिंपरी-चिंचवड, सांगली, साताराच्या दौऱ्यावर काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्ष सोनल पटेल , माजी मंत्री बसवराज पाटील आणि मोहन जोशी हे तीन पदाधिकारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या दौऱ्यामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस नेते मंडळींची सुसंवाद साधत पक्षबांधणी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चाचपणी करत संवाद साधणार होते. मात्र पूर परिस्थितीमुळे सदरचा दौरा रद्द झाल्याने काँग्रेसच्या स्थानिक बंडखोर नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
स्थानिक काँग्रेसच्या या बंडखोर नेते मंडळींनी विद्यमान शहराध्यक्ष प्रकाश वाले तसेच जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्याविरोधात बंडखोरीचे निशाण फडकव प्रदेशातील नेत्यासमोर तक्रारीचा पाढा वाचणार होते. शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष हटाओचा नारा या बंडखोर नेते मंडळीनी दिला आहे. प्रदेश पातळीवर नेत्यांसमोर याबाबत साकडे घालणार होते. तशी तयारी या बंडखोर नेते मंडळींनी केली होती. मात्र अचानक दौरा रद्द झाल्याने बंडाच्या पवित्र्यातील हे नेते मंडळी नाराज झाली आहेत.
सध्या काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण आहे. विद्यमान शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या विरोधात अनेक बंडखोर स्थानिक नेतेमंडळींनी मोहीम उघडली आहे. प्रकाश वाले हटाव काँग्रेस बचाव असा नारा दिला आहे. जिल्ह्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रदेशातील नेतेमंडळींचा दौरा महत्त्वाचा होता. मात्र अचानक दौरा रद्द झाल्याने बंडखोरांचे मनसुबे धुळीला मिळाल्याने काही काँग्रेसाच्या एका गटात ‘खुशी ‘ तर दुसऱ्या गटात ‘गम’ अशी परिस्थिती सध्या काँग्रेस भवन मध्ये दिसत आहे.