सोलापूर : पंतप्रधान आवास योजने अंतर्गत आशियातील सर्वात मोठे अभिनव असे एकमेव सोलापुरातील (कुंभारी) तीस हजार असंघटित कामगारांचा पथदर्शी व महत्वकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प आहे.
या ‘रे नगर को-ऑप सोसायटी फेडरेशन” मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील पहिल्या टप्प्यातील दहा हजार पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकाकडून गृहकर्जासाठी घरांची सोडत लॉटरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज रविवारी ( 1 ऑगस्ट ) सकाळी साडेदहा वाजता प्रातिनिधिक स्वरूपात वितरित कार्यक्रम सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांनी माहिती दिली.
हा कार्यक्रम सोहळा दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील दोड्डी रोडवरील रे नगर गृहप्रकल्प येथे संपन्न होणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या कार्यक्रमासाठी म्हाडा प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी .,शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जि. प सदस्य अण्णाराव बाराचारे, कुंभारी सरपंच श्रुती निकंबे, उपसरपंच वैशाली होनराव , माजी नगरसेविका नसीमा शेख , माकपचे राज्य समिती सदस्य सिद्धाप्पा कलशेट्टी, नगरसेविका कामिनी आडम, सिटू राज्य महासचिव एम.एच शेख, सचिव अनिल वासम, रे नगर फेडरेशन चेअरमन नलिनी कलबुर्गी ,रे नगर फेडरेशन सचिव युसुफ शेख, मुमताज शेख, कुरमिया मेत्रे, यशोदा दंडी, विजयलक्ष्मी महेशंन, मुरलीधर सुचू, लता सारंगी, संदिप रेउरे, वीरेंद्र पद्या , लक्ष्मण माळी, शंकर गड्डम आदींच्या उपस्थित कार्यक्रम होणार आहे.