मुंबई : कोरोना रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम जोरात सुरू आहे. आता व्हॉट्सअॅपवर लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये MyGov corona helpdesk क्रमांक 9013151515 सेव्ह करावा लागेल. नंतर त्यावर ‘Book Slot’ असा मेसेज पाठवा. मग तुम्हाला ओटीपी येईल. तो ओटीपी चॅटमध्ये टाका. तसेच पीनकोड टाका. लसीकरण केंद्र तुम्हाला दिसतील. मग तुमची अपॉईंटमेट निश्चित करा. MyGov chatbot चा वापर करुन आतापर्यंत 32 लाख लोकांनी कोविड सर्टिफिकेट डाऊनलोड केले आहे.
लोकांना कोविड लसीकरणाचे सर्टिफिकेट WhatsApp वरुन मिळवता येत होते. पण, आता नागरिकांना WhatsApp वर लसीकरणासाठी नोंदणीही करता येणार आहे. नागरिक MyGov च्या WhatsApp क्रमांकावर मेसेज पाठवून लसीकरणासाठी नोंदणी करु शकणार आहेत. अनेक भारतीय आता मोबाईलवर WhatsApp चा वापर करत आहेत. शिवाय WhatsApp वरुन लस घेण्यासाठी नोंदणी करणे अधिक सोपं जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
CoWin चा वापर करुन लोक सध्या लसीकरणासाठी नोंदणी करतात. पण, आता WhatsApp वरुनही त्यांना ही सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे. CoWin पेक्षा WhatsApp वरुन लसीकरण नोंदणी अधिक सोपी जाणार असल्याचं बोललं जातंय. याआधी नागरिकांना WhatsApp वरुन लसीकरणाचे सर्टिफिकेट मिळत होते. यासाठी लोकांना MyGov हेल्पडेस्कवर कोविड सर्टिफिकेटची विनंती करावी लागत होती. त्यानंतर काही सेकंदातच लोकांना कोविड सर्टिफिकेट मिळत होते. केंद्र सरकारच्या या सुविधेचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते.
* असे मिळवा व्हाटसअपवरुन प्रमाणपत्र
– तुमच्या कॉन्टॅक्ट यादीत MyGov corona helpdesk क्रमांक 9013151515 असायला हवा
– क्रमांक सेव्ह केल्यानंतर यावर तुम्ही “Book Slot” असा मेसेज पाठवा
– तुम्हाला SMS द्वारे सहा अंकी OTP क्रमांक पाठवला जाईल. तो क्रमांक याठिकाणी चॅटमध्ये टाका
– तुमच्या मोबाईल क्रमांकावर नोंद असलेल्या सदस्यांची यादी तुम्हाला दिसेल
– तुम्ही 1,2,3 पर्यायांपैकी एक निवडू शकता
-चॅटमध्ये तुम्ही पीन कोड टाका, त्यानंतर WhatsApp तुम्हाला परिसरातील लसीकरण केंद्राची यादी दाखवेल
– तुमची अपॉईंटमेंट निश्चित करा आणि दिलेल्या तारखेला लसीकरण केंद्राला भेट द्या