लीड्स : इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटीत कर्णधार विराट कोहली 17 चेंडूवर फक्त 7 धावा काढून बाद झाला. यानंतर विराटचा खेळ आता संपला आहे, तो फ्लॉप ठरला आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहे. विराटसाठी आकडेवारीही धक्कादायक आहे. गेल्या 50 डावात त्याला एकही आंतरराष्ट्रीय शतक करता आले नाही. 642 दिवसांपूर्वी त्याने पहिले शतक केले होते. नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध कोहलीने 136 धावांची खेळी केली होती.
याआधी विराटच्या करिअरमध्ये असे दोन वेळा झाले होते जेव्हा त्याला दोन शतकांच्या मध्ये बराच वेळ लागला होता. फेब्रुवारी 2011 ते सप्टेंबर 2011 या काळात 24 डावा त्याला शतक करता आले नव्हते. त्यानंतर फेब्रुवारी 2014 ते ऑक्टोबर 2014 या काळात 25 डावात तो शतक करू शकला नव्हता. पण यावेळी विराट 50 डावांपर्यंत पोहोचला आहे.
भारताने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पहिल्याच दिवशी बुधवारी लाजिरवाणी कामगिरी केली. भारताचा पूर्ण संघ 78 धावांवर बाद झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याआधी भारताने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या (36) केली होती. तर 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध पूर्ण भारतीय संघाला फक्त 42 धावा करता आल्या. तसेच 1974 मध्ये भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 58 धावांवर बाद झाला.
तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून एका चांगल्या खेळीची सर्वांनाच अपेक्षा असताना पहिल्या डावात तो केवळ 7 धावा करुन बाद झाला आहे. त्याच्यासह संपूर्ण भारतीय संघाचा पहिला डाव केवळ 78 धावांवर आटोपला असून याचवेळी विराटच्या नावे नको ते अर्धशतक झाले आहे.
तर हे अर्धशतक म्हणजे विराट मागील 50 आंतरराष्ट्रीय डावांत एकही शतक ठोकू शकलेला नाही. नोव्हेंबर, 2019 मध्ये बांग्लादेश विरुद्ध डे-नाइट कसोटी सामन्यात शेवटचं शतक ठोकणाऱ्या विराटच्या बॅटमधून पुन्हा शतक कधी येईल? य़ाची सर्वच भारतीय आतुरतेने वाट पाहत आहेत. पण लीड्स येथील तिसऱ्या कसोटीतही विराटच्या हाती निराशाच आल्याने त्याने 50 आंतरराष्ट्रीय डाव हे शतक न ठोकता घालवले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये 27 शतकांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 70 शतकं ठोकणाऱ्या कोहलीचा सध्या खराब टाईम सुरु आहे. मागील दोन वर्षात एकाही प्रकारात तो शतक ठोकू शकलेला नाही. याआधी तो सलग 25 डावांत शतक ठोकू शकला नव्हता. मात्र आता ही संख्या 50 झाली आहे. शतकच नाही तर कोहलीला अर्धशतक ठोकणंही अवघड झालं आहे. कारण 2020 पासून आतापर्यंत तो केवळ 3 कसोटी अर्धशतकं ठोकू शकला आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यात तो आतापर्यंत WTC पकडून तो 7 डाव खेळला आहे. ज्यामध्ये एकही अर्धशतक आलेले नाही. आता लीड्समधील दुसऱ्या डावाततरी तो हा दुष्काळ संपवतो का? हे पाहावे लागेल.