रत्नागिरी : खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत हे दोन राऊत शिवसेनेला पार खोल बुडवणार आहेत, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. संजय राऊत आणि विनायक राऊत हे दोघेही वायफळ बडबड करणारे नेते आहेत. संजय राऊतांना त्याचसाठी ठेवले. संपादक सोडा त्यांना हे बोलायलाच ठेवले. काय तो विनायक राऊत. विनायक राऊतांचं नाव घेऊन तुम्ही मूड खराब करता, असेही राणे म्हणाले.
नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला. संजय राऊत आणि विनायक राऊत हे दोघेही माझ्या दृष्टीने वायफळ बडबड करणारे नेते आहेत. संजय राऊतांना त्याचसाठी ठेवलंय. संपादक सोडा त्यांना हे बोलायलाच ठेवलंय. काय तो विनायक राऊत. ते दोन राऊतच शिवसेनेला डुबवणार आहेत. आतमध्ये एकदम खोल तलावात, अशी टीका राणे यांनी केली. विनायक राऊतांचं नाव घेऊन तुम्ही मूड खराब करता. त्यामुळे मला संध्याकाळचं जेवण टाळावं लागेल, असा टोलाही राणे यांनी लगावला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शिवसेनेतील अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. येतील त्या सर्वांना आम्ही पक्षात घेणार आहोत. ते सगळे वेटिंग लिस्टवर आहेत. कुणाला न घ्यावं हे आम्ही ठरवणार आहोत, जन आशीर्वाद यात्राही कुणाच्याही प्रवेशासाठी नव्हती. केंद्राची कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी होती. त्यामुळे या यात्रेत कुणाला प्रवेश देण्यात आला नाही, असं राणेंनी स्पष्ट केलं.
राणेंच्या पाठी लागू नका. नाही तर मी आता थोडंच बोलतोय. नाही तर सर्वच बोलावं लागेल. ते परवडणार नाही. केसेस काढू हे काढू. अरे मी एवढाच क्रिमिनिल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? मंत्री, आमदार, नगरसेवक शाखाप्रमुख कसं केलं? पहिली पदं तुम्हीच दिली ना तेव्हा विरोध का केला नाही? 39 वर्षात शिवसेनेसाठी जे काही केलं… साहेबांना जेव्हा अतिरेक्याकंडून धोका होता, साहेबांना जेव्हा मातोश्री सोडायला सांगितलं. तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नसल्याचे राणेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.