अहमदनगर : उसाच्या शेतातून 5 टन गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत 50 लाख रुपये असल्याचं समजतं. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात पोलिसांनी ही कारवाई केली. तसेच पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतलं. दरम्यान, गुटखा तसेच गांजा यावर राज्यामध्ये बंदी घातलेली असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याने परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सुगंधित सुपारी, गुटखा तसेच गांजा यावर राज्यामध्ये बंदी घातलेली असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याने परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या गांजाच्या विक्रीमागे मोठी टोळी तर कार्यरत आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.
पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी शिवारात उसाच्या शेतात गांजा ठेवण्यात आला होता. पोलिसांना शेतात गांजा लपवल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे आणि पाथर्डी पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने छापा टाकून कारवाई केली आहे. याशिवाय या गांजाची राखण करणाऱ्या 2 महिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.