यवतमाळ : रस्ते कंत्राटदारांची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी या चर्चेत आल्या होत्या. आता ईडीने भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीने धाडी टाकली आहे. गवळींनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार वाशीमचे शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख हरीश सारडा यांनी केली होती. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलल्यानंतर त्यांच्या गाडीवर गवळी यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यावरून गवळी आक्रमक झाल्या आहेत. मला ईडीची नोटीस आलेली नाही. सध्या अधिकारी चौकशी करत आहेत, असं त्या म्हणाल्या. तसेच सध्या आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. शिवसेना नेत्यांना टार्गेट केलं जातंय. भाजपनं जुलमी सत्र सुरू केलंय, असाही आरोप त्यांनी केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काही दिवसांपूर्वीच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणातच वाशिम दौरा केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच ईडीने कारवाईला सुरूवात केली आहे. ईडीची टीम आज सोमवारी वाशिममध्ये दाखल झाली आहे. भावना गवळी यांच्याविरोधात झालेल्या तक्रारीनंतर ईडीने कारवाई केली. भावना गवळी यांच्याविरोधात हरीश कारडा नावाच्या व्यक्तीने अंमलबजावणी संचलानलय (ED) कडे तक्रार केली होती. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलले. हरीश कारडा यांनी केलेले आरोप हे १९९२ पासूनच्या प्रकरणात केले आहेत.
यावर खासदार भावना गवळी म्हणाल्या, मला ईडीची कोणतीही नोटीस आलेली नाही. माझ्या संस्थेच्या ठिकाणी ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. पण मला व्यक्तीगत कोणतीही नोटीस ईडीने दिलेली नाही. आणीबाणी सारखी वागणूक याठिकाणी दिली जात आहे. सगळ्या शिवसेनेच्या लोकांना टार्गेट केले जात आहे. म्हणूनच भूमाफिया असलेल्या भाजप आमदाराचीही भाजपने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी केली आहे. भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांच्या चौकशीमुळे त्यांनीही भाजपच्या आमदाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. भाजपचे कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या ५०० कोटींच्या जमीन घोटाळ्याच्या ईडी चौकशीची मागणी भावना गवळी यांनी केली आहे.