ठाणे : माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरिवाल्यांने केलेल्या हल्ल्यात त्यांची दोन बोटे तुटली गेली त्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जुपिटर रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आणि सांगितले की तुम्ही आता आराम करा आम्ही बघतो आता काय करायचे ते, असे म्हणाले.
राज ठाकरे यांनी आयुक्तांची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. लवकर बरे व्हा, बाकी आम्ही बघतो अशा शब्दात राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांना धीर दिला आहे.
राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात कल्पिता पिंपळे यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ‘कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. लवकरं बरे व्हा असे मी सांगायला आलो होतो. दोन गोष्टी पाहणं गरजेचं आहे एक म्हणजे अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले, आमचं आंदोलन होत ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काल म्हंटल्याप्रमाणे, जे काही घडलेय त्याचं दुख: आहेच. काळपण सोकावतोय. अशा प्रकारची हिंम्मत ठेचणे गरजेचे आहे. पोलीस कारवाई करतायत. न्यायालयही त्यांच कर्तव्य बजावेल अशी अपेक्षा आणि आशा आहे. त्याला कठोर शिक्षा होईल. असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
दरम्यान, प्रशासनाने शहरातील फेरीवाल्यांविरोधात मंगळवारपासून जोरदार कारवाई सुरु केली आहे. यातच आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जखमी कल्पिता पिंपळेंची भेट घेतली. नुकतेच सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी त्या फेरीवाल्याला सोडणार नाही असा संताप व्यक्त केला होता.
राज ठाकरे म्हणाले होते, “पोलिसांकडून जेव्हा तो सुटेल तेव्हा तो आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. ह्यांची जेव्हा सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा त्यांना कळेल. हिंमत कशी होते यांची. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो.