मंगळवेढा : भाळवणी येथून हाजापूरकडे निघालेल्या मोटर सायकलस्वाराने जीपला धडक दिल्याने डोकीस मार लागून जखमी होवून उपचारादरम्यान प्रकाश गणपती वाडेकर(वय 39 रा. भाळवणी) याचा मृत्यू झाला असून या घटनेची मंगळवेढा पोलिसात नोंद झाली आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील मयत प्रकाश वाडेकर हे दि. 8 रोजी दुपारी 3.00 वा भाळवणी येथून हाजापूरकडे मोटर सायकलवरून जात असताना स्वामी यांचे वस्तीजवळ समोरून येणार्या जीपला धडकल्याने डोक्याला मार लागून जखमी झाल्याने प्रथमतः मंगळवेढ्यात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारासाठी सोलापूर येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. उपचार सुरु असतानाच तो मयत झाला असल्याची खबर डॉ.पल्लवी मेहता यांनी पोलिसात दिली असून अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
* येड्राव येथील आश्रम शाळेच्या कर्मचार्याने घेतले पेटवून
मंगळवेढा : येड्राव येथील शाहू शिक्षण संस्था अंतर्गत माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनिअर कॉलेजने डोनेशनच्या नावाखाली 2 लाख रुपये घेतल्याने झालेल्या अन्यायाविरूध्द प्रकाश गोरख करडे (रा.येड्राव) याने अंगावर रॉकेल ओतून घेवून पेटवून घेतले. यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या कर्मचार्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील आरोपी प्रकाश करडे हा येड्राव येथील आश्रम शाळेत कामाला आहे.संस्थेने विनाअनुदानितवर काम करून घेवून डोनेशनच्या नावाखाली 2 लाख रुपये घेतले.या झालेल्या अन्यायाविरूध्द आरोपीने आत्मदहन करण्याचा इशारा दि. 30 रोजी सकाळी 10.30 च्या दरम्यान शाळेच्या गेटसमोर दिला होता. या प्रमाणे त्याने अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिस शिपाई मळसिध्द कोळी याने दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.वि.सं.कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार सुनिल गायकवाड हे करीत आहेत.