मुंबई : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा कधी सुरू होणार, असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यातच आता शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाची तयारी सुरू आहे. त्यानुसार राज्याच्या शिक्षण विभागाची सुधारित नियमावली करण्यात येत आहे. प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक उभारा, अशी सूचना राज्य टास्क फोर्सने शिक्षण विभागाला केली आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक उभे केले जाणार आहे.
राज्यात दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 47 हजारहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 509 जणांचा मृत्यू झाला आहे. ही रुग्णसंख्या गेल्या दोन महिन्यांत नोंदली गेलेली सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल गुरुवारी जाहीर केले आहे. राज्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यात डेल्टाचे रुग्ण अधिक दिसून येत आहे.
राज्यात शाळा बंद आहेत. मात्र, त्या कधी सुरु होणार याची अनिश्चितता आहे. आता शाळा सुरू करण्यासाठी शिक्षम विभागाची तयारी सुरू आहे. त्यानुसार राज्याच्या शिक्षण विभागाची सुधारित नियमावली करण्यात येत आहे. प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक उभारा, अशी सूचना राज्य टास्क फोर्सकडून शिक्षण विभागाला केली आहे. अनेक सूचनापैकी ही महत्वाची सूचना आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या सूचनेनुसार शाळा सुरू कऱण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. राज्यातील शाळा कधी सुरू होणार हे निश्चित नाही मात्र शाळांसाठी नव्या सूचनांची सुधारित नियमावली तयार करण्यात येत आहे. त्यानुसार सीएसआर निधीचा वापर करून राज्यातील प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक उभे केले जाणार आहे. विविध प्राथमिक उपचारांवरील औषधेही शाळेत उपलब्ध असणार आहेत.
शाळा सुरू करण्यासाठी राज्य टास्क फोर्सने शालेय शिक्षण विभागाने अनेक नवीन सूचना दिल्या असून त्या सूचनांचा अभ्यास केल्यानंतर विभागाने यासाठी नवी सुधारीत नियमावली काढण्याची तयारी केली आहे. त्याचा शासननिर्णयही जाहीर केला जाणार असल्याची माहिती आहे.
राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा विचार करून त्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी सीआरच्या निधीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. शाळांमध्ये हेल्थ क्लिनीक उभे करताना त्यासाठीची आवश्यक मनुष्यबळ आणि आवश्यता पडल्यास डॉक्टरांचीही वेळोवेळी मदत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे शाळांमध्ये सर्दी, ताप आदीसारख्या आजारांवरील औषध गोळ्याही उपलब्ध केले जाणार आहे.
शाळा सुरू करण्यासाठीच्या नवीन नियमावलीत विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचल्यावर त्याची तपासणी, आरोग्यविषयक काळजीही घेतली जाणार आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठीच्या विशेष सूचना नव्या नियमावलीत दिल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे शाळा, खेळाची मैदाने, शैक्षणिक साहित्य, आदीं निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. वेळोवेळी पुस्तकांची अदलाबदल टाळण्यासाठीही नियोजन करण्याच्या सूचना यात देण्यात येणार आहेत.