मुंबई / अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावानं विजयी व्हायचे आणि मग त्यांच्यावरच उठता बसता टीका करायची असा उद्योग सध्या सुरू आहे. सकाळी ब्रश करण्यापूर्वीच मोदींच्या नावानं शिमगा सुरू होतो. मोदी हे आमचे आई बाप आहेत. तुमच्या आई बापाला शिव्या दिलेलं तुम्हाला चालेल का, असं ते म्हणाले.
भाजप विरोधी पक्षांचे राज्यातील नेते देखील पंतप्रधान मोदींवर विखारी टीका करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावानं निवडून यायचं आणि मग त्यांच्यावरच उठता बसता टीका करायची असा उद्योग सुरू आहे. सकाळी ब्रश करण्यापूर्वीच मोदींच्या नावानं शिमगा सुरू होतो. मोदी हे आमचे आई बाप आहेत. तुमच्या आई बापाला शिव्या दिलेलं तुम्हाला चालेल का?’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पाठीत खंजीर खुपसणारे असं म्हटलं केलं की आधी एकाच नेत्याचा चेहरा डोळ्यासमोर येत होता, मात्र आता पाठीत खंजीर खुपसणारे म्हटल्यावर आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येत असल्याचे ’ म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नामोल्लेख करीत अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चंद्रकांत पाटील दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर आहेत. यावरून पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाटील यांनी शिवसेनेवर पाठीत खंजीर खुपसल्याची टीका केली होती. यावरही त्यांनी भाष्य केले. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी खेळली. निकालाच्या दिवशी ४ वाजता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होती. मात्र त्यावेळी त्यांनी तुम्ही तुमची पत्रकार परिषद करा मी माझी करतो असे म्हटले होते. त्यावेळीच काहीतरी लोचा असल्याचे समजत होते. त्यावेळी त्यांनी सर्व मार्ग मोकळे असल्याचे सांगितले. तर काँग्रेसआणि राष्ट्रवादीसोबत युती केली. त्यामुळे याला विश्वासघातच म्हणतात असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
शिवसेना फक्त मुंबईपुरतीच मर्यादित होती. शिवसेनेला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरून मराठवाडा-विदर्भात आणलं. आता ५६ वर तुम्ही मुख्यमंत्री होऊन बसलात आणि १०५ वाल्याला टाटा, बाय-बाय केले. त्यामुळे आम्हाला कुणाबरोबरही लढायचे नाही, असेही पाटील म्हणाले.