नवी दिल्ली / मुंबई : देशात कोरोना लसीकरण मोहिम जोरात सुरू आहे. त्यातच आता लसीकरणाच्या बाबतीत मुंबईने एक विक्रम केला आहे. देशात एक कोटीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत मुंबईचा क्रमांक लागला आहे. कोविन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. मुंबईत 1 कोटी 63 हजार 497 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत राज्याने आज एकाच दिवशी 11 लाख 91 हजार 921 नागरिकांना लस देऊन उच्चांक नोंदविला आहे. आजपर्यंत 6 कोटी 15 लाख 16 हजार 137 लसींच्या मात्रा दिल्या असून त्यात दुसऱ्या लसीची मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण 6 कोटी 14 लाख 16 हजार 137 लसींच्या मात्र देण्यात आल्या असून त्यात दुसऱ्या लसीची मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या शनिवारी जारी केलेल्या एकत्रित अहवालानुसार महाराष्ट्रात 1 कोटी 71 लाख जणांना दुसऱ्या लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
देशात एक कोटीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत मुंबईचा क्रमांक लागला आहे. कोविन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. कोविन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोविन अॅपवरील माहितीनुसार मुंबईत 1 कोटी 63 हजार 497 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. यामध्ये 72 लाख 75 हजार 134 लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर 27 लाख 88 हजार 363 नागरिकांनी कोरोनाचे दोन डोस घेतले आहे. सध्या मुंबईत 507 केंद्रावर लसीकरण मोहिम सुरू आहे. यापैकी 325 सरकारी केंद्र आहे तर 182 केंद्र हे खाजगी आहे.
कोविन अॅपवरील माहितीनुसार मुंबईत मागील 30 दिवसातील आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर सर्वात अधिक डोस 27 ऑगस्टला देण्यात आले होते. या दिवशी 1 लाख 77 हजार 017 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली होती. या शिवाय 21 ऑगस्टला 1 लाख 63 हजार 775 नागरिकांना तर 23 ऑगस्टला 1 लाख 53 हजार 881 नागरिकांना लस देण्यात आली होती.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 11 लाख 91 हजार 921 नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या 6 कोटी 27 लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.
21 ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी 11 लाख 4 हजार 464 नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती, शनिवारी झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत 11 लाख 91 हजार 921 नागरिकांचे लसीकरण झाले आहे, रात्री उशिरापर्यंत या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.