पुणे : पुण्यातील संगमवाडीत माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या पुतण्यांच्या घरात जबरी चोरी झाली. हरिश्चंद्र मनोहर मोझे आणि मोहन मनोहर मोझे यांच्या घरातून तिघा चोरट्यांनी शंभर तोळे सोने आणि चार लाख रुपयांची रोख रक्कम चोरुन नेले. कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. ते घरी आल्यावर घरातील वस्तू इतरत्र पडलेल्या दिसल्या. तसेच कपाटातील दागिने, पैसेही जागेवर नव्हते. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
घरातून चोरट्यांनी सुमारे शंभर तोळे सोने आणि तीन ते चार लाखांचा ऐवज चोरून नेला. यात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान घडली. याबाबत हरिश्चंद्र मनोहर मोझे (वय ४९, संगमवाडी, येरवडा) यांनी येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले.
राजू मोझे व त्यांचे भाऊ मोहन मोझे हे त्यांच्या घरावा कुलूप लावून शुक्रवारी (ता. ३) गावाला गेले होते. ते काल रविवारी सायंकाळी परत आले. त्यावेळी त्यांना ही घटना लक्षात आली. दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील लॉकर तोडून त्यातील ४० लाख २० हजारांचे दागिने, चांदीचे दागिने, किंमती घड्याळे लंपास केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मोहन मोझे यांच्या घरातील दागिने, घड्याळे असा एकूण १३ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. येरवडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली आहे. मोझे कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. तिघे जण घरात शिरुन काही तासात शंभर तोळे सोने आणि जवळपास चार लाखांची रक्कम घेऊन पसार झाल्याचे घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले.
* तरुणावर कोयत्याने वार
पुणे : भांडणे मिटविण्यासाठी मध्यस्थी केल्याच्या रागातून सराईत गुन्हेगारासह चौघांनी तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी गौरव रोहिदास काची (वय ३७, रा. गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. यावरुन अविनाश ऊर्फ पप्पु चंद्रकांत चौधरी (वय ३६), विशाल ऊर्फ पिंटु चौधरी (वय ३८), आकाश यादव (वय २५, तिघेही रा. गुरुवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शेखर चिकने (रा. गाडीखाना, शुक्रवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अविनाश चौधरी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. खडक पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघा जणांना अटक केली आहे.